Daily Wear Gold Earrings : कमी ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, पाहा १० नाजूक-सुंदर डिजाईन्स, रोज वापरता येतील
Updated:August 21, 2025 15:17 IST2025-08-21T14:41:17+5:302025-08-21T15:17:36+5:30
Light Weight Daily Wear Gold Earrings : कमी वजनामुळे डिजाईनर्सना क्रिएटिव्ह डिझाइन्स तयार करता येतात. यात तुम्हाला झुमके हवे असतील तर ते सुद्धा मिळेल.

कानातले घातल्यानंतर चेहऱ्याला वेगळीच शोभा येते. कानातल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. मोठे, लहान, झुमके, खड्यांचे, मोतीचे... पण रोज घालण्यासाठी कमी वजनाचे कानातले उत्तम ठरतात.
कमी ग्रॅममध्ये कमीत कमी बजेटमध्ये कोणत्या डिजाईनचे सुंदर कानातले तु्म्हाला घालता त्याच्या सुंदर डिजाईन्स पाहूया.
सोन्याच्या कानातल्यांमध्ये तुम्हाला स्टोन डिजाईन, छोटे लटकन असे बरेच ऑपश्न मिळतील. हे वापरायला सोयीस्कर असतात.
हे कानातले दिवसभर घातले तरी कानांवर ताण-तणाव येत नाही. यामुळे त्वचेला छिद्र किंवा कोणतीही इजा होत नाही. रोजच्या कामासाठी हे अतिशय उत्तम आहेत.
कमी वजनामुळे डिजाईनर्सना क्रिएटिव्ह डिझाइन्स तयार करता येतात. यात तुम्हाला झुमके हवे असतील तर ते सुद्धा मिळेल.
२४ कॅरेटपेक्षा २२ किंवा १८ कॅरेटमधल्या सोन्याचा वापर करून नाजूक कानातले रोजच्या वापरासाठी बनवता येतील.
स्टण इअररिंग्स, हुप्स, थ्रेडर्स असे बरेच पर्याय मिळतील.
हे कानातले ऑफिसवेअरसाठी उत्तम पर्याय आहेत.
कानातल्यांमध्ये अमेरिकन डायमंडसारखे लहान लहान खडे असल्यास अधिक उठून दिसेल.
१ ते २ ग्रॅममध्ये तुम्हाला आवडत्या डिजाईन्सचे कानातले बनवून मिळतील.