खादी कॉटनच्या १२ सुंदर साड्या-सोबत डिझायनर ब्लाऊज, दिसाल इतक्या स्मार्ट आणि सुंदर की चर्चा तुमचीच!
Updated:January 20, 2026 18:54 IST2026-01-20T11:16:13+5:302026-01-20T18:54:07+5:30
Khadi Cotton Saree With Designer Blouse Khadi Cotton Saree Designs : योग्य काळजी घेतल्यास या साड्या आणि त्यांचे प्रिंट्स अनेक वर्ष टिकतात आणि त्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही.

सध्याच्या फॅशनमध्ये लोकप्रिय असलेला इंडो-वेस्टर्न किंवा एथनिक एलिगन्स या प्रकारातील या खादी कॉटनच्या साड्या आहेत. ( Khadi Cotton Saree 12 Patterns)
या साड्या शुद्ध सुती किंवा लिनन कॉटन या प्रकारातील असून त्या दिसायला अत्यंत साध्या पण मनमोहक असतात. (Khadi Cotton Saree With Designer Blouse)
या साड्यांमध्ये सहसा पेस्टल रंग किंवा नैसर्गिक रंग वापरेला जातात ज्यातून एक शांत आणि सौम्य लूक मिळतो.
साडी साधी असताना त्यावर कलमकारी किंवा ब्लॉक प्रिंट असलेले ब्लाऊज उठून दिसते.
साध्या साडीवर गडद रंगाचे किंवा मोठ्या फुलांच्या डिझाईन्सचे प्रिंटेड ब्लाऊज घातल्यामुळे एक सुंदर कॉन्ट्रास्ट लूक मिळतो.
अशा प्रिंट्समध्ये भारतीय हस्तकलेचा वापर केलेला असतो जो पारंपारीक आणि अधुनिक अशा दोन्ही पद्धतींनी सजवता येतो.
कॉटन फॅब्रिक असल्यामुळे या साड्या दिवसभर नेसण्यासाठी अतिशय आरामदायक आणि हलक्या असतात.
हे कॉम्बिनशन्स ऑफिसवेअर,छोटे कार्यक्रम किंवा औपचारीक मिटिंग्ससाठी उत्तम पर्याय ठरतात.
यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी घातल्यास साडीचा लूक अधिक खुलून येतो. प्रिंटेंड ब्लाऊज शिवताना हाय नेक, बोट नेक किंवा कोपरापर्यंतच्या बाह्या ठेवल्यास त्याला अधिक क्लासी लूक येतो.
योग्य काळजी घेतल्यास या साड्या आणि त्यांचे प्रिंट्स अनेक वर्ष टिकतात आणि त्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही.
प्रत्येक प्रिंटेड ब्लाऊजची डिझाईन वेगळी असल्यानं एकाच साडीवर वेगवेगळे ब्लाऊज वापरून तुम्ही दरवेळी नवीन लूक मिळवू शकता.
सिंपल साडी आणि हेवी प्रिंटेड ब्लाऊज हे समीकरण साधेपणातलं सौंदर्य दर्शवते.