लग्नाच्या सिजनसाठी घ्या खास कलांजली पैठणी; ८ रंग, आरी वर्क ब्लाऊजसोबत मिळेल सुंदर पैठणी
Updated:December 10, 2025 13:59 IST2025-12-10T13:11:54+5:302025-12-10T13:59:19+5:30
Kalanjali Paithani Designs : कलांजली पैठणीसोबत मिळणारे आरी वर्क केलेले ब्लाऊज पीीस हे संपूर्ण लूकला एक परीपूर्ण आणि स्टायलिश फिनिशिंग देते.

लग्नसराईसाठी खास मुहूर्तावर प्रत्येक वधूला आणि तिच्या नातेवाईकांना पारंपारीक आणि आकर्षक पोशाख हवा असतो. अशावेळी महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी हा एक उत्तम आणि अनिवार्य पर्याय ठरतो. (Kalanjali Paithani Designs)
कलांजली खास लग्नसमारंभासाठी उत्कृष्ट दर्जाच्या पैठणी साड्यांचा संग्रह घेऊन आली आहे. या साड्यांचे विणकाम अतिशय बारीक आणि कलात्मक असते. ज्यामुळे त्यांना एक भव्य आणि शाही रूप प्राप्त होते.
कलांजलीची पैठणी विकत घेतल्यास तुम्हाला फक्त साडीच नाही तर त्यासोबत खास डिझाईन केलेलं आरी वर्कचं ब्लाऊज पीसही मिळेल.
या पैठण्यांसाठी वापरलेले रेशीम उच्च प्रतीचे असते आणि विणकाम मराठमोळ्या परंपरेला जपून केलेले असते.
विविध रंगाचे आणि डिजाईन्सचे पर्याय आवडीनुसार हिरवा, पिवळा, जांभळा अशा अनेक आकर्षक रंगांमध्ये पैठणी उपलब्ध आहेत.
पैठणीचा पदर हा त्याचे मुख्य आकर्षण असते. ज्यावर मोर, पोपट, कमळ किंवा पारंपारीक नक्षीकाम केलेले असते.
कलांजली पैठणीसोबत मिळणारे आरी वर्क केलेले ब्लाऊज पीीस हे संपूर्ण लूकला एक परीपूर्ण आणि स्टायलिश फिनिशिंग देते.
आरी वर्क हातानं केली जाणारी एक सुंदर कला आहे. ज्यामुळे ब्लाऊजला एक खास आणि कस्टमाईज्ड लूक मिळतो.
हे ब्लाऊज पीस साडीच्या रंगाशी जुळणारे किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे असू शकते जे लग्नाच्या वधुसाठी एक अद्वितीय आणि संस्मरणीय पोशाख बनवते.
कलांजली पैठणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये २००० रूपयांपासून ते ५००० रूपयांपर्यंतच्या रेंजमध्ये मिळेल.