घरात बोअरिंग गाऊन घालण्यापेक्षा ट्राय करा स्टायलिश कफ्तान गाऊन, ७ स्मार्ट प्रकार, दिसाल आकर्षक
Updated:December 20, 2025 09:40 IST2025-12-20T09:37:22+5:302025-12-20T09:40:02+5:30

घरात घालण्यासाठी कफ्तान गाऊन किंवा कफ्तान नाईटी प्रकारात खूप वेगवेगळे डिझाईन्स आलेले आहेत..
हे कफ्तान गाऊन दिसायला आकर्षक तर असतातच, पण खूप आरामदायीही असतात..
हे गाऊन सैलसर असले तरी अंगावर अजिबात गबाळे दिसत नाहीत हे यांचं खास वैशिष्ट्य..
कॉटन, रेयॉन, सिंथेटीक, पॉलिस्टर अशा कित्येक प्रकारात तुम्हाला कफ्तान गाऊन मिळू शकतात.
हे गाऊन अगदी २५० रुपयांपासूनही मिळतात. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या किमतीत घरात घालायला स्टायलिश कपडे घ्यायचे असतील तर हा एक चांगला पर्याय आहे..
ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या बाजारपेठेतही कफ्तान गाऊन अगदी रास्त दरात मिळू शकतात.
या प्रत्येक गाऊनवरचं प्रिंट एवढं आकर्षक आहे की ते बघताक्षणीच घ्यावंसं वाटतं..