गुरूपुष्यामृत योग २०२५ : डेली वेअरसाठी १८ कॅरेट सोन्याचे शॉर्ट मंगळसुत्र; कमी पैशात येईल सुंदर लूक, पाहा
Updated:August 18, 2025 16:14 IST2025-08-18T14:49:58+5:302025-08-18T16:14:01+5:30
Gurupushyamrut Yoga 2025 : 18 कॅरेट सोन्यात तुम्ही नाजूक एका सरीचं किंवा डबर सरीचं मंगळसुत्र बनवून घेऊ शकता.

लांब जड मंगळसुत्रांऐवजी सध्या शॉर्ट मंगळसुत्र घालणं महिला पसंत करतात. याची लांबी कमी असते आणि कमी ग्रॅममध्ये बनवता येऊ शकतं. रोज वापरायला उत्तम पर्याय असतो.(18 carat gold short mangalsutra for daily wear Beautiful look) तुम्ही गुरूपुष्यामृत योगासाठी म्हणजेच २१ ऑगस्टला ही मंगळसुत्र विकत घेऊ शकता.
18 कॅरेट सोन्यात तुम्ही नाजूक एका सरीचं किंवा डबर सरीचं मंगळसुत्र बनवून घेऊ शकता.
कॅज्युअल वेअर, ऑफिस वेअर, पार्टी-फंक्शनसाठीसु्द्धा घालू शकता.
वजनानं कमी असल्यामुळे रोज वापरायला सोईस्कर असतात
हिऱ्याचे पेडंट, नावाचं पहिलं अक्षर, हार्ट शेप, पानाचं छोटं लॉकेट, इन्फिनीटी साईन यात तुम्ही छोटे मंगळसुत्र बनवून घेऊ शकता.
चोकर स्टाईलमध्येही तुम्हाला छोटं मंगळसुत्र मिळेल.
या मंगळसुत्राचे पेडंट निवडताना तुमच्या ड्रेसिंग स्टाईलनुसार जड किंवा साधं निवडा.
दररोज वापरणार असाल तर चेन मजबूत असेल असे पाहा.
जितके काळेमणी तितकी मंगळसुत्राची किंमत कमी असेल. बारीक काळ्या मणय्
या मंगळसुत्रावर तुम्हाला साजेसे कानातलेही घेता येतील. ज्यामुळे सुंदर सेट दिसेल.