चांदीच्या जोडव्यांची १० नाजूक-सुंदर डिजाईन्स; ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीतही नाजूक दागिना
Updated:August 20, 2025 16:13 IST2025-08-20T15:16:35+5:302025-08-20T16:13:38+5:30
Gurupushyamrut 2025 : रोजच्या वापरासाठी साधे जोडवे चांगले ठरतात.

बाजारात जोडव्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. गुरूपुष्यामृत (Gurupushyamrut Yog 2025) योगानिमित्त चांदीची तुम्ही जोडवे विकत घेऊ शकता. जी तुम्हाला अगदी कमीत कमी बजेटमध्ये उपलब्ध होतील.(10 Beautiful Silver Toe Ring Silver Jewellery Designs)
जोडवे म्हणजेच टो-रिंगला भारतीय दागिन्यांमध्ये महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. यामुळे केवळ पायांचे सौंदर्य वाढत नाही तर अनेक धार्मिक परंपरा जोडल्या गेल्या आहेत.
जोडव्यांची किंमत त्याची डिजाईन, वजन आणि शुद्धतेवर अवलंबून असते.
३०० रूपयांपासून ते 5०० रूपयांपर्यंत तुम्हाला हवेतसे जोडवे पाहायला मिळतील. हे जोडवे तुम्ही स्थानिक ज्वेलरीची दुकानं किंवा ऑनलाईन खरेदी करू शकता.
अधुनिक जोडव्यांमध्ये कुंदन, मीनाकारीचे काम केलेले असते.
रोजच्या वापरासाठी साधे, कमी वजनाचे जोडवे चांगले ठरतात.
अनेक कुटूंबांमध्ये जोडवे विकत घेतल्यानंतर त्याची पूजा केली जाते. ही जोडवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जातात.
चांदीची जोडवी घातल्यानंतर साबण, डिटर्जंटनं लगेच स्वच्छ करा.