छूमछूम घुंगराच्या बांगडीची! पाहा घुंगरु असलेल्या बांगड्यांचे ९ प्रकार, सणासुदीला हातात हवीच अशी नजाकती चूडी
Updated:August 21, 2025 16:07 IST2025-08-21T15:08:48+5:302025-08-21T16:07:10+5:30

एरवी कित्येक जणी हातात बांगड्या घालत नाहीत. पण सणासुदीचे दिवस आले की मात्र पारंपरिक कपडे घातल्यावर हातात बांगड्या पाहिजेच..
आता बांगड्यांमध्ये कित्येक नवे प्रकार आले असून घुंगराच्या बांगड्या सध्या प्रचंड ट्रेण्डी आहेत. या बांगड्यांमध्ये कित्येक नवनविन प्रकार पाहायला मिळतात.
तुमच्या कपड्यांना मॅच होणाऱ्या बांगड्या आणि त्याच्या आजुबाजुला घुंगराच्या बांगड्या असं कॉम्बिनेशनही खूप छान दिसतं.
थ्रेड वर्कच्या बांगड्यांवर जडविण्यात आलेले सुंदर नाजुक घुंगरू.. या डिझाईन्सलाही सध्या खूप मागणी आहे.
अशा पद्धतीच्या नाजुक घुंगरू बांगड्या घेतल्या तर काचेच्या किंवा इतर कोणत्याही प्लेन बांगड्यांच्या मध्ये घालायला त्या छान दिसतात.
ऑक्सिडाईज प्रकारातही अशा कित्येक बांगड्या पाहायला मिळतात. अशा बांगड्या तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.
मिररवर्क आणि त्याला जोडण्यात आलेले घुंगरू अशा पद्धतीचे अनेक ब्रेसलेटही बाजारात पाहायला मिळतात.
हातात घुंगराच्या बांगड्या आणि त्याच्या जोडीला कानात घुंगराचे झुमके.. अशी स्टाईल यंदा गणेशोत्सवात करून बघाच.
घुंगरू आणि नाजुक झुमके हा बांगड्यांचा पॅटर्न अतिशय युनिक असून तो तुमच्या हातांचे सौंदर्य नक्कीच खुलवेल.
घुंगराच्या ब्रेसलेटचा हा एक आणखी सुंदर प्रकार पाहा..