दसऱ्यासाठी १००० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे कुर्ता सेटस; १० नवीन डिजाईन्स; सुंदर, उंच दिसाल
Updated:September 28, 2025 15:18 IST2025-09-28T15:07:11+5:302025-09-28T15:18:51+5:30
Get cotton kurta sets for Dussehra under Rs 1000 : यावर तुम्हाला राऊंड नेक, व्हि नेक, सर्कल नेक किंवा क्लोज नेक, बोट नेक असे अनेक पॅटर्न्स ट्राय करू शकता.

आजकाल भरलेले, खूपच स्टोन्स असलेले ड्रेस न घालता महिला सॉफ्ट, अंगाला आरामदायक वाटतील असे कपडे सणासुधीसाठी निवडतात. दसऱ्याला तु्म्ही कॉटनचे ड्रेस घालू शकता. (Get cotton kurta sets for Dussehra under Rs 1000)
१००० रूपयांच्या आत तुम्ही असे घेरदार कॉटनचे अनारकली ड्रेसेस घेऊ शकता. किंमतीनुसार ड्रेसेसचे पॅटर्न बदलत जाईल.
हे ड्रेसेस घेताना तुम्हाला पूर्ण सेट्स मिळतील. दुपट्टा, पायजमा आणि अनारकली कुर्ती असा सेट असेल.
तुम्ही ऑनलाईन पाहिल्यास एकापेक्षा एक पॅटर्न्स मिळतील किंवा स्ट्रिट शॉपिंग करत असाल तर कमीत कमी किमतीत चांगले कुर्ता सेट्स मिळतील.
यावर तुम्हाला राऊंड नेक, व्हि नेक, सर्कल नेक किंवा क्लोज नेक, बोट नेक असे अनेक पॅटर्न्स ट्राय करू शकता.
या पॅटर्न्समध्ये तुम्हाला बरेच रंगांचे पर्याय मिळतील. तुम्ही घरात किंवा ऑफिसवेअरसाठी हे पॅटर्न्स ट्राय करू शकता.
तर तुम्हाला प्लेन लॉग्न स्लिव्हज नको असतील तर तुम्ही पफ स्लिव्हजचे पॅटर्न ट्राय करू शकता.
या ड्रेससवरतुम्हाला बलून स्लिव्हजचा पर्यायही मिळेल. जर कापड घेऊन शिवणार असाल तर हवातसा गळा आणि स्लिव्हज शिवू शकता.
या ड्रेससमध्ये तुम्हाला जॅकेट टाईपचे डिजाईन्ससुद्धा मिळतील.
या कुर्त्यासह तुम्ही प्लाझो, सिगारेट पॅन्ट्स किंवा चुनीदार ट्राय करू शकता.