Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या काचेच्या बांगड्यांचे सुंदर सेट्स; १० प्रकारचे बांगड्यांचे सेट्स, हात दिसतील नाजूक
Updated:October 12, 2025 12:35 IST2025-10-12T11:33:38+5:302025-10-12T12:35:14+5:30
Beautiful sets of glass bangles for Diwali : चमकदार बांगड्यांऐवजी थोडं मॅट फिनिश असलेल्या बांगड्या सुंदर दिसतात.

दिवाळीसाठी (Diwali 2025) काचेच्या बांगड्या सध्या ट्रेंडींग आहेत. फक्त काचेच्या बांगड्या न घालता सेट्स घातले तर हात भरलेले दिसतात. (Diwali Special 10 types of bangle sets)
मध्यभाही दोन किंवा चार जाड कडे किंवा पाटल्या घाला. त्याच्या दोन्ही बाजूंना मॅचिंग साध्या काचेच्या बांगड्या किंवा बारीक नक्षीच्या बांगड्या घातल्या जातात. (Get beautiful sets of glass bangles for Diwali)
साडी ड्रेसमधील दोन प्रमुख रंग किंवा कॉस्ट्रास्ट रंगाच्या बांगड्या एकत्र करून तुम्ही सेट्स बनवू शकता.
काचेच्या बांगड्यांवर लहान आरसे लावलेल्या डिजाईन्स खूपच आकर्षक दिसतात आणि दिवाळीच्या प्रकाशात सुंदर चमकतात.
चमकदार बांगड्यांऐवजी थोडं मॅट फिनिश असलेल्या बांगड्या सुंदर दिसतात.
काचेच्या बांगड्यांच्या सेटमध्ये काही बांगड्यांवर छोटे किंवा मोठे कुंदन वर्क किंवा बारीक चमकी आणि स्टोन्स लावून अधिकाधिक आकर्षक बनवले जाते.
तुमच्या आऊटफिटच्या मुख्य रंगांपेक्षा थोड्या वेगळ्या रंगाच्या बांगड्या निवडा.
एकाच सेटमध्ये साध्या काचेच्या, नग लावलेल्या मेटलच्या बांगड्यांचे मिश्रण छान दिसते.
या बांगड्या तुम्हाला ऑनलाईन साईट्सवर किंवा दुकानात सहज मिळतील. ऑनलाईन घेत असाल तर vrikshamindia.com या साईटला नक्की भेट द्या. यात सुंदर बांगड्यांचे कलेक्शन आहे.
या बांगड्या तुम्हाला ४०० रूपयांपासून ते २५०० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये पाहायला मिळतील. (Photo Credit- ndcreations07, Instagram, vrikshamindia.com)