पारंपरिक ‘रिंग्ज’ना नव्या स्टाइलची झळाळी, पाहा कानातल्या रिंगचे १० नवीन डिझाइन्स, बजेटही कमी
Updated:December 23, 2024 16:04 IST2024-12-22T17:21:16+5:302024-12-23T16:04:46+5:30
Earring Ring Designs : कानात रिंग घातल्यानं चेहरा सुंदर दिसतो.

रिंगांच्या कानातल्यांची फॅशन अजूनही जुनी झालेली नाही. ऑफिसवेअर असो की रोज घरी वापरणं असो बऱ्याच महिला कानात रिंग घालण्याला प्राधान्य देतात. (Earring Ring Design)
कानात रिंग घातल्यानं कानांची शोभा वाढते इतकंच नाहीतर चेहरा सुंदर दिसतो. (Latest Earring Designs Easy To Wear)
रिंगांचे कानातले तुम्ही मोठ्या, लहान, मध्यम अशा तिन्ही आकारात पाहू शकता. तुम्हाला आवडतील त्या पॅटर्नचे कानातले घ्या.
जर तुम्ही ऑफिसला जाताना घालण्यासाठी किंवा ड्रेसवर घालण्यासाठी रिंगा घेणार असाल तर छोट्या आकाराचेच घ्या.
जर तुम्हाला साडीवर रिंगा घालायच्या असतील तर मोठ्या आकाराच्या रिंग्सची निवड करू शकता.
रिंगांच्या खालच्या भागातल तुम्ही छोटे घुंगरूसुद्धा लावू शकता.
प्लेन रिंग्स रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहेत.
जर तुमचा चेहरा मोठा, गोलाकार असेल तर प्लेन रिंगा न घालता असे कानातले निवडा.
लग्नसमारंभात घालण्यासाठी किंवा घरी कार्यक्रमासाठी घालण्यासाठी ही मस्त डिजाईन आहे.
या डिजाईन्सचे कानातले तुम्हाला २ ते ३ ग्रॅम सोन्यात उपलब्ध होतील.
(Image Credit- Social Media)