१ साडी-७ सुंदर ड्रेसेस; साडीचा ड्रेस शिवण्याच्या ७ स्टायलिश आयडिया, साडीची ग्रेस आणि ड्रेसचा कम्फर्ट
Updated:February 7, 2026 15:15 IST2026-02-06T16:25:50+5:302026-02-07T15:15:27+5:30
Dresses From Old saree designs : जर साडी खराब झाली असेल तर त्यातला चांगला भाग निवडून लहान मुलांसाठी पोलकी किंवा फ्रॉक्स शिवता येतात.

जुन्या काठपदराच्या किंवा सिल्कच्या साडीचा घेर वापरून तम्ही फ्लोर लेन्थ अनारकली ड्रेस किंवा इंडो वेस्टर्न गाऊन तयार करून शकता. (Dresses From Old saree designs)
साडीच्या कापडापासून एक स्टायलिश लांब कुर्ता आणि उरलेल्या भागापासून मॅचिंग स्कर्ट किंवा प्लाझो बनवता येतो. (Dress Ideas Of Old Saree)
साडीचा पदर आणि काठ वापरून मुलांसाठी किंवा स्वत:साठी एक भव्य लेहंगा आणि ब्लाऊज शिवता येते. (How To Make Dress From Old Saree)
साडीच्या आकर्षक बॉर्डरचा वापर करून तुम्ही कोणत्याही साध्या ड्रेसवर घालण्यासाठी लांब किंवा आखूड क्रेप जॅकेट तयार करू शकता.
सध्या फॅशनमध्ये असलेले को-ऑर्ड सेट्स हलक्या वजनाच्या साड्यांपासून बनवले जातात जे अत्यंत ट्रेंडींग दिसतात.
साडीचा पदर खूपच सुंदर असेल तर त्याचा वापर हेवी दुपट्टा म्हणून करून उरलेल्या कापडाची लहान पोटली बॅग बनवता येते. पुनर्वापर केल्यामुळे कपड्यांची नासाडी टळते आणि आपल्याला एक युनिक आणि बजेटमधील डिझायनर ड्रेस मिळतो.
साडीचे काठ काढून ते दुसऱ्या एखाद्या साध्या ड्रेसच्या गळ्याला किंवा हाताला लावून त्याला नवा लूक देतात. वेस्टर्न लूक हवा असल्यास साडीपासून शॉर्ट वन पीस किंवा मिड लेंथ ड्रेस शिवणं हा उत्तम पर्याय आहे.