Diwali Shopping: लक्ष्मीपुजनासाठी समई घ्यायची? बघा मोठ्या आकाराचे लेटेस्ट डिझाईन्स- घराला येईल शोभा
Updated:October 9, 2025 12:23 IST2025-10-09T12:15:40+5:302025-10-09T12:23:00+5:30

दिवाळी म्हणजे दिपोत्सव. या दिपोत्सवानिमित्त मोठ्या आकाराच्या समयांची खरेदी करायची असेल तर पुढे असणारे काही सुंदर डिझाईन्स एकदा बघून घ्या...
या बघा पारंपरिक धाटणीच्या सुंदर समया. या समया नेहमीच घरात शोभून दिसतात.
समईमध्ये थोडा नवा स्टायलिश आणि रेखीव प्रकार पाहायचा असेल तर या दोन्ही समया पाहा. अतिशय रेखीव डिझाईन आहे.
अशा पद्धतीची एकच मोठी समई घेतली तर ती कोणत्याही मंगल प्रसंगी अशा पद्धतीने सुशोभित करून ठेवता येते.
मोर, घुंगरु आणि हत्ती असे वेगवेगळे आकार असणारी ही समई बघताक्षणीच आवडण्यासारखी आहे.
पितळाच्या समया न घेता व्हाईट मेटलची समई घेतली तरी त्यात असे कित्येक डिझाईन्स उपलब्ध आहेत.
व्हाईट मेटल प्रकारात असे कित्येक डिझाईन्स मिळतात. बजेट जास्त असेल तर अशी समई चांदीतही घडवून घेता येते.
समईमधला मोर नेहमीच आकर्षक दिसतो. अशा नाजुक डिझाईन्सच्या सुंदर समयांची जोडी तुम्ही लक्ष्मीपुजनाला लावू शकता.
मीना काम असलेल्या समयांमध्येही दिवाळीनिमित्त कित्येक वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. या समयाही अतिशय आकर्षक दिसतात.