Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या मोत्यांचे सुंदर कानातले; ८ नव्या डिजाईन्स, सोन्यालाही लाजवतील अशा डिजाईन्स
Updated:October 19, 2025 16:04 IST2025-10-19T15:41:13+5:302025-10-19T16:04:20+5:30
Diwali 2025 Pearl earrings for Diwali : मोत्यांसोबत सहसा अमेरिकन डायमंड, कुंदन, किंवा रंगीत खडे वापरलेले डिझाईन्स खूप ट्रेंडमध्ये आहेत.

दिवाळीत साडीवर किंवा कुर्ता सेट्सवर घालण्यासाठी तुम्ही मोत्यांचे कानातले घेऊ शकता. जवळपासच्या आर्टिफिशयल ज्वेलरीच्या दुकानात किंवा ऑनलाईन शॉप्समध्ये तुम्हाला असे कानातले सहज मिळतील. (Pearl earrings for Diwali)
मोत्यांचे कानातले तुम्ही कोणत्याही रंगाच्या काठपदराच्या साडीवर घालू शकता. या कानातल्यांमध्ये बरीच व्हरायटी पाहायला मिळेल.
मोत्याचे झुमके, टॉप्स त्यावर सुंदर नक्षी असलेले कानातले तुम्हाला २०० रूपयांपासून ते ८०० रूपयांपर्यंत सहज उपलब्ध होतील.
हे कानातले घालून झाल्यानंतर लगेच प्लास्टीकच्या कागदात ठेवून डब्यात ठेवा. ज्यामुळे मॉईश्चर येऊन काळेपणा येणार नाही.
हे कानातले तुमच्या लूकला राजेशाही तितकाच पारंपारीक लूक देतील. साडी किंवा लेंहेंग्यावरही हे कानातले छान दिसतील.
आर्टिफिशयल कानातले घेताना वजनाला हलके असतील असं पाहा अन्यथा कानांवर ताण येऊ शकतो.
अर्धचंद्राच्या आकारात मोती आणि डायमंडचे कॉम्बिनेशन असलेले कानातले तुम्हाला खूप सुंदर दिसतील.
या प्रकारच्या कानातल्यांमध्ये बाहेरच्या बाजूनं मोती लावलेले असतात. आतल्या बाजूला गुलाबी किंवा लाल मोत्यांची सजावट असते.