दिवाळीसाठी घ्या मोती पेंडंटचे मंगळसुत्र; १० नवीन, आकर्षक डिजाईन्स, सणासुधीला उठून दिसाल
Updated:October 6, 2025 16:41 IST2025-10-06T16:05:29+5:302025-10-06T16:41:07+5:30
Diwali 2025 Moti Mangalsutra Design (Motyache Mangalsutra) : नेहमी तेच टिपिकल गोल्डन पेडंट न निवडता तुम्ही मोती पेंडंटचे मंगळसुत्र घालू शकता.

दिवाळी (Diwali 2025) म्हटलं की खरेदी आलीच. दिवाळीसाठी नवीन साड्यांबरोबरच ज्वेलरीसुद्धा बऱ्याच महिला खरेदी करतात. सणासुधीला मोत्याचे दागिने हमखास घातले जातात.(Moti Mangalsutra Designs)
नेहमी तेच टिपिकल गोल्डन पेडंट न निवडता तुम्ही मोती पेंडंटचे मंगळसुत्र घालू शकता. पारंपारीक तितकाच मॉडर्न लूक तुम्हाला या मंगळसुत्रात मिळेल.(Latest Moti Pendant Mangalsutra Designs)
यावर तुम्हाला मॅचिंग असा कानातल्यांचा सेटसुद्धा मिळेल. कानातले आणि मंगळसुत्राचा हा कॉम्बो खूपच सुंदर दिसतो.
५०० ते २००० रूपयांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या डिजाईन्सचे मोत्यांचे पेंडंट मिळतील.
मोत्यांच्या आजूबाजूला तुम्ही गुलाबी, लाल, हिरव्या स्टोन्सच्या डिजाईन्स निवडू शकता. तुमच्या साडीच्या रंगानुसार मंगळसुत्राची निवड करा.
आर्टिफिशियल ज्वेलरीच्या दुकानात किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्हाला हे दागिने सहज उपलब्ध होतील.
तुम्ही लक्ष्मी मंगळसुत्रही घेऊ शकता ज्यात लक्ष्मी कोरलेली असते आणि आजूबाजूंनी मोत्यांची किनार असते.
मोत्यांचा आकार आणि गुणवत्ता यावर मंगळसुत्राची किंमत अवलंबून असते.
या मंगळसुत्रांसोबत तुम्हाला ठुशी, कानातले बांगड्या असा पूर्ण सेट सुद्धा उपलब्ध होईल.
या प्रकारचे मंगळसुत्र गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रेंडीग आहेत.