Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला घ्या १ ग्रॅम सोन्याचे नाजूक झुमके; कमी वजनाचे सुंदर कानातले
Updated:October 16, 2025 17:06 IST2025-10-16T16:27:20+5:302025-10-16T17:06:31+5:30
Dhanteras 2025 : दिवाळीत धनत्रयोदशीला किंवा पाडव्याला पत्नीला गिफ्ट म्हणून देण्यासाठी तुम्ही सोन्याचे नाजूक, कमी वजनाचे झुमके घेऊ शकता.

दिवाळीत (Diwali 2025) धनत्रयोदशीला (Dhanteras) किंवा पाडव्याला पत्नीला गिफ्ट म्हणून देण्यासाठी तुम्ही सोन्याचे नाजूक, कमी वजनाचे झुमके घेऊ शकता. (Dhanteras Special 1 gram Gold earrings)
कमी ग्रॅममध्येच पण आकर्षक डिजाईन्स निवडा, झुमक्यांमध्ये बारीक जाळीचे वर्क किंवा कट वर्क केलेले डिजाईन्स छान दिसतात. यामुळे वजन कमी राहतं पण झुमके भरलेले दिसतात.
झुमक्याच्या खाली लटकण्यासाठी सोन्याच्या जाड बीड्सऐवजी छोटे सोन्याचे बीड्स किंवा मोती, रंगीत खडे असलेले पर्याय निवडा. यामुळे सोन्याचे वजन कमी होते आणि आकर्षक दिसते.
पूर्ण झुमक्यांऐवजी वरच्या बाजूला स्टड आणि खाली नाजूक पेंडंट लटकन असलेले डिजाईन्स निवडा जे कमी वजनात छान दिसतात.
शक्य असल्यास २४ कॅरेटऐवजी १४ कॅरेट सोन्याचे झुमके घ्या. १४ कॅरेट डिजाईन्स जास्त मजबूत आणि कमी वजनात उपलब्ध असतात तसंच ते कमीत कमी दरात मिळतात.
कमी वजनात हातानं नक्षीकाम केलेलं झुमके निवडा. हे मशिन मेड झुमक्यांपेक्षा कमी वजनात तयार होतात.
कमी ग्रॅममध्ये झुमके घेत असाल तरीही हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा.
झुमक्यांच्या या डिजाईन्स रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत.