रोज वापरण्यासाठी सोन्याच्या मंगळसुत्राचे ८ नाजूक पॅटर्न्स; पाहा सेलिब्रिटींचे मंगळसुत्र डिजाईन्स
Updated:November 17, 2024 18:40 IST2024-11-17T18:23:46+5:302024-11-17T18:40:41+5:30
Gold mangalsutra : सध्याचा ट्रेंड पाहता बॉलिवूड सेलिब्रिटींना नाजूक पण गळ्यात उठून दिसणारे मंगळसुत्राचे डिजाईन्स फार आवडतात.

बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे कपडे, ज्वेलरी घालावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. कारण त्यांची स्टाईल प्रत्येकालाच प्रभावित असते. अभिनेत्रींच्या मंगळसुत्राच्या डिजाईन्स नेहमीच व्हायरल होत असतात. (Delicate patterns of gold mangalsutra)
अभिनेत्री आपल्या गळ्यात कोणत्या प्रकारचं मंगळसुत्र घालतात. याचं प्रत्येकालाच आकर्षण असतं. त्यांनी निवडलेल्या डिजाईन्स बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.
अभिनेत्रीचं नवीनच लग्न झाल्यानंतर सगळ्यात आधी लक्ष जाते ते त्यांच्या गळ्यातल्या मंगळसुत्राकडे. या खास डिजाईन्स मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात.
सध्याचा ट्रेंड पाहता बॉलिवूड सेलिब्रिटींना नाजूक पण गळ्यात उठून दिसणारे मंगळसुत्राचे डिजाईन्स फार आवडतात.
अगदी ५ ते ६ ग्रॅमच्या आत तुम्हाला या सुंदर डिजाईन्स बनवून मिळतील.
सिंगल स्टोन, इन्फिनिटी, हार्ट शेप असे वेगवेगले पेंडंट या मंगळसुत्रांमध्ये दिसून येतात.
एकाच मंगळसुत्रात २-३ पेडंटच्या नाजूक डिजाईन्सही तुम्ही ट्राय करू शकता.
(Image Credit- Social Media)