डेली वेअरसाठी लाईटवेट मंगळसूत्र; १० डिझाईन्स, ऑफिस वेअर किंवा साडीवरही शोभेल मंगळसूत्र
Updated:January 9, 2026 20:54 IST2026-01-09T17:35:50+5:302026-01-09T20:54:21+5:30
Delicate Light Weight Mangalsutra For Daily Use : हे मंगळसूत्र वजनानं अतिशय हलके असल्यामुळे दिवसभर गळ्यात घालून ठेवले तरी कोणताही त्रास होत नाही.

दैनंदिन वापरासाठी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हा आजकाल महिलांमध्ये एक अतिशय लोकप्रिय पर्याय ठरत आहे.
१ ग्रॅमचे मंगळसूत्र खऱ्या सोन्याच्या तुलनेत अतिशय परवडणारे आणि स्वस्त असते. त्यामुळे कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही हे मंगळसूत्र घेऊ शकता.
यामध्ये तुम्हाला पारंपारीक वाटी डिझाईन्सपासून ते अधुनिक ऑफिसवेअरर्सच्या नव्या डिझाईन्स उपलब्ध होतील.
हे मंगळसूत्र वजनानं अतिशय हलके असल्यामुळे दिवसभर गळ्यात घालून ठेवले तरी कोणताही त्रास होत नाही.
प्रगत तंत्रज्ञानामुळे या दागिन्यांना हुबेहूब खऱ्या सोन्यासारखा पिवळाधमक रंग आणि चमक दिली जाते.
प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना महागडे सोने हरवण्याची भिती असते अशावेळी १ ग्रॅमचे मंगळसूत्र वापरं सुरक्षित ठरतं.
खासकरून घरकाम, ऑफिस किंवा साध्या कार्यक्रमांसाठी डिझाईन केलेली ही मंगळसूत्र तुम्ही कुठेही वेअर करू शकता.
याची चमक जास्त काळ टिकवण्यासाटी त्यावर पाणी,साबण किंवा परफ्यूमचा थेट संपर्क टाळणं आवश्यक असतं.
स्वस्त असल्यामुळे तुम्ही आवडीनुसार आणि फॅशनुसार वारंवार नवीन डिझाईन्स बदलू शकता.
जर कोटींग दर्जेदार असेल तर हे मंगळसूत्र ६ महिने ते १ वर्ष आरामात टिकते.