Join us   

हलव्याचे नाजूक दागिने एक से एक सुंदर, पाहा पर्याय! यादगार करा पहिली संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 11:59 AM

1 / 9
महाराष्ट्रातच नाही तर भारतात अनेक राज्यांत वेगवेगळ्या नावांनी मकर संक्रांत साजरी केली जाते.
2 / 9
संक्रांत म्हणजे तीळगूळ आणि हलवा याचेच महत्त्व जास्त. यातही लग्नानंतरची पहिली संक्रांत म्हणजे घरात आलेल्या सुनेचे कौतुकच कौतुक.
3 / 9
एरवी सोन्याच्या दागिन्यांना असलेले मोल संक्रांतीच्या दिवशी हलव्याच्या दागिन्यांना येते. बाजारात मिळणाऱ्या या दागिन्यांची व्हरायटी पाहून आपल्यालाही खूप छान वाटते.
4 / 9
बाजारात सध्या हलव्याच्या दागिन्यांच्या एकाहून एक व्हरायटी पाहायला मिळत असून यामध्ये पारंपरिक दागिन्यांबरोबरच काही ट्रेंडी दागिनेही पाहायला मिळतात.
5 / 9
गळ्यातला हार, मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, बिंदी, कंबरपट्टा, मुकूट, वाकी, नथ असे एकाहून एक दागिने सध्या बाजारात उपलब्ध असतात. पुरुषांसाठीही मोठा हार, मुकूट, हातातले, फुलांचा गुच्छ असे दागिने मिळतात.
6 / 9
काळ्या साडीवर उठून दिसणारा हा पांढरा हलवा या दिवसाची रंगत वाढवतो आणि आपल्या सौंदर्यात भरच पाडतो.
7 / 9
मोठमोठ्या दागिन्यांबरोबरच बाजारात आता तरुणींना पसंत पडतील असे अगदी नाजून आणि मोजके दागिन्यांचे सेटही उपलब्ध असतात. अगदी खऱ्या दागिन्यांप्रमाणे दिसणारे हे दागिने लक्ष वेधून घेणारे ठरतात.
8 / 9
यामध्ये कागदी किंवा खऱ्या फुलांसोबत केलेली डिझाइन, सोनेरी बेस असलेली डिझाइन, खोट्या फुलांचा वापर करुन केलेले कॉम्बिनेशन असे एकाहून एक प्रकार पाहायला मिळतात.
9 / 9
संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या दिवशी नटून थटून एकमेकींना हळदीकुंकवाला बोलावले जाते. तर तीळगूळ देऊन सौभाग्याचे वाण देण्याचीही पद्धत आहे.
टॅग्स : खरेदीमकर संक्रांती