summer special cotton sarees : कॉटनच्या साड्यांचे ७ प्रकार; उन्हाळ्यात नेसा हलक्या-फुलक्या सुंदर साड्या
Updated:February 17, 2026 16:17 IST2026-02-17T12:38:53+5:302026-02-17T16:17:48+5:30
Cotton Saree Patterns : या साड्यासुद्धा मध्य प्रदेशातील असून त्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काठ आणि पदरासाठी प्रसिद्ध आहेत. यावर सहसा भौमितिक डिझाईन्स असतात.

चंदेरी कॉटन
मध्य प्रदेशातील चंदेरी येथील ही साडी तिच्या पारदर्शकतेसाठी आणि वजनाला हलकी असल्यामुळे ओळखली जाते. यामध्ये सिल्क आणि कॉटनच्या धाग्यांचे मिश्रण असते. ज्यामुळे साडीला एक प्रकारची चमक मिळते. (7 Types Of Cotton Saree Different Types Of Cotton Saree)
माहेश्वरी कॉटन
या साड्यासुद्धा मध्य प्रदेशातील असून त्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काठ आणि पदरासाठी प्रसिद्ध आहेत. यावर सहसा भौमितिक डिझाईन्स असतात. (Cotton Saree Patterns)
खादी कॉटन
हातमागावर विणलेले खादी साडी ही पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असते. उन्हाळ्यात ही साडी अत्यंत आरामदायी असते आणि शरीराला थंडावा देते.
सांबलपुरी कॉटन
ओडीसामधील ही साडी इकत विणकाम पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. यावर शंख, चक्र किंवा फुलांची पारंपारीक नक्षी असते. जी विणण्यापूर्वी धाग्यांना रंगवून तयार केली जाते.
टांत कॉटन
पश्चिम बंगालमधील ही साडी अतिशय मऊ आणि पारदर्शक असते. उन्हाळ्याच्या दिवसांत रोजच्या वापरासाठी ही साडी अतिशय उत्तम मानली जाते. याचे काठ थोडे जाड आणि उठावदार असतात.
कोरा कॉटन
दक्षिण भारतात ही साडी लोकप्रिय आहे. ही साडी थोडी ताठ असते. त्यामुले नेसल्यामुळे ती कडक आणि नीटनेटकी दिसते. प्रोफेशनल लूकसाठी ही उत्तम निवड आहे.
जामदानी कॉटन
ही साडी तिच्यावरील अत्यंत बारीक आणि सुबक विणकामासाठी ओळखली जाते. मलमलच्या कपड्यावर हातानं विणलेली ही नक्षी साडीला एक रॉयलल लूक देते.
या साड्या घाम व्यवस्थित शोषून घेतात आणि त्वचेला त्रासही होत नाही. कॉटन साडीवर ऑक्सिडाईज चांदीचे दागिने किंवा मण्यांच्या माळा अतिशय सुंदर दिसतात.