दंड बारकुडे असतील तर 'या' प्रकारचे ब्लाऊज शिवा; ८ सुरेख पॅटर्न, साडी नेसून दिसाल सुडौल सुंदर
Updated:November 13, 2025 17:16 IST2025-11-13T16:22:29+5:302025-11-13T17:16:34+5:30
Blouse Sleeves Patterns For Thin Arms : जर दंड खूपच बारीक असतील तर ब्लाऊज आकर्षक आणि व्यवस्थित दिसावा यासाठी खाली गोष्टी विचारात घेऊन शिलाई करावी.

जर दंड खूपच बारीक असतील तर ब्लाऊज आकर्षक आणि व्यवस्थित दिसावा यासाठी खालील गोष्टी विचारात घेऊन शिलाई करावी. (Blouse Sleeves Patterns For Thin Arms)
ब्लाऊजची फिटींग फार महत्वाची असते. दंड बारीक असल्यामुळे ब्लाऊज सैल न ठेवता तो शरीराच्या मापाप्रमाणे अगदी अचूक असावा. (Unique Blouse designs)
दंड लहान असल्यास कप पॅड्स वापरणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे. यामुळे ब्रेस्टला चांगला आकार मिळतो आणि ब्लाऊजची फिनिशिंग सुधारते. (Latest Blouse design For Thin Arms)
प्रिन्सेस कट किंवा कटोरी ब्लाऊज शिवा. ज्यामुळे ब्लाऊजला उठावदार लूक मिळतो.
ब्रेस्ट लहान असल्यास बोट नेक, हाय नेकसारखे गळ्याचे डिजाईन्सस चांगले दिसतात.
ब्लाऊजला आवश्यकतेनुसार आणि योग्य ठिकाणी डॉटर्स द्यावेत. जेणेकरून कपड्याला चांगला आणि गोलाकार आकार मिळेल.
फुगीर किंवा जाडसर दिसणारी कपडे की ब्रोकेट, रॉ सिल्क किंवा पॅडींगला मदत करणारे फॅब्रिक्स वापरावे. यामुळे नैसर्गिकरित्या थोडा व्हॉल्यूम वाढतो.
लहान बस्ट असलेल्या महिलांसाठी कोपरपर्यंतच्या किंवा थ्री-फोर्थ स्लिव्ह्ज खूपच आकर्षक दिसतात.