ब्लाऊजच्या बाह्यांच्या ३० नवीन स्टायलिश डिझाईन्स; हात दिसतील सुडौल-बाह्या दिसतील सुंदर
Updated:February 9, 2026 17:24 IST2026-02-08T13:56:40+5:302026-02-09T17:24:44+5:30
Latest Blouse Sleeves New Patterns : फुल स्लिव्हज ब्लाऊजमध्ये मनगटाजवळील भागावर भारी इम्ब्रॉयडरी किंवा मण्यांचे काम करणं हा २०२६ चा मोठा ट्रेंड आहे.

अलिकडे ब्लाऊजच्या स्लिव्हजच्या डिझाईन्समध्ये बरेच नवनवीन स्टाईल्स पाहायला मिळत आहे. केवळ गळ्याच्या डिझाईन्सवर लक्ष न देता आता स्लिव्हज हे ब्लाऊजचे मुख्य आकर्षण ठरत आहे. (Blouse Sleeves New Patterns)
पारंपारीक साडीला अधुनिक आणि स्टायलिश लूक देण्यासाठी खालीन नवीन स्लिव्हजच्या डिझाईन्स खूपच चर्चेत आहेत. (30 Blouse Sleeves New Designs)
सिल्क किंवा पैठणी साड्यांवर कोपरापर्यंतच्या पफ बाह्या अत्यंत रॉयल दिसतात. याशिवाय खालच्या बाजूनं लटकन लावणं खूपच ट्रेंडीग दिसते.
अधुनिक लूकसाठी कट वर्कचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. बाह्यांच्या कडांना त्रिकोणी किंवा गोलाकार कट देऊन त्यावर मोती किंवा मण्यांचे काम केले जाते.
कापडाच्यामध्ये ट्रांन्सपरंट नेटचा वापर करून त्यावर नाजूक एम्ब्रॉयडरी केली जाते. ज्यामुले ब्लाऊजला एक इल्यूजन लूक मिळतो.
जर तुम्हाला थोडा ड्रॅमेटिक किंवा मॉडर्न लूक हवा असेल तर रफल्स उत्तम पर्याय आहेत. फुल स्लिव्हज ब्लाऊजमध्ये मनगटाजवळील भागावर भारी इम्ब्रॉयडरी किंवा मण्यांचे काम करणं हा २०२६ चा मोठा ट्रेंड आहे.
मल्टी रेअर रफल्स बाह्यांच्या टोकाला दोन ते तीन थरांचे रफल्स जोडल्यानं साडीला इंडो वेस्टर्न लूक येतो.
कोपरापासून खाली पसरत जाणाऱ्या बेल आकाराच्या बाह्या सध्या लग्नसराईत लोकप्रिय आहेत. बाह्यांच्या मधोमध उभ्या रांगेत मोती किंवा फ्रॅब्रिक बटण लावल्यानं साधे ब्लाऊजही डिझायनर वाटते.
आजकाल जास्त दागिने घालण्याची गरज पडू नये म्हणून आरी वर्कचे हेवी डिझाईन्सही ब्लाऊजवर केले जातात.
डिझाईन निवडताना तुमच्या हाताची ठेवण आणि साडीचा प्रकार लक्षात घ्या. काठापदराच्या साडीवर पफ किंवा कट-वर्क जास्त चांगले दिसते तर डिझायनर साडीवर रफल्स किंवा नेट वापरणं अधिक सोयीचं ठरतं.