दंड जाडजूड असतील तर ‘या’ १२ प्रकारच्या ब्लाऊजच्या बाह्या निवडा, साडी नेसून दिसाल स्लिम फिट
Updated:March 25, 2026 11:29 IST2026-03-24T21:27:17+5:302026-03-25T11:29:59+5:30
Blouse Sleeves Designs For Fat Arms : जाड किंवा फुगीर कापड वापरण्याऐवजी अंगाला चिकटून बसणारे मऊ कापड निवडावे.

जर तुमचे दंड थोडे जाड असतील आणि तुम्हाला ते बारीक किंवा सुडौल दिसावेत असे वाटत असेल तर ब्लाऊज शिवताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (12 Blouse Sleeves Designs For fat Arms)
कोपरापर्यंत लांब असलेल्या बाह्या जाड दंडांसाठी उत्तम पर्याय आहेत. यामुळे दंडाचा वरचा जाड भाग झाकला जातो आणि हात लांब, सडपातळ दिसतात. (Blouse Sleeves Designs For Fat Arms)
ब्लाऊजसाठी गडद रंगाच्या कापडाचा वापर करा. गडद रंगामुळे शरीराचा तो भाग कमी उठावदार दिसतो.
जाड किंवा फुगीर कापड वापरण्याऐवजी अंगाला चिकटून बसणारे मऊ कापड निवडावे. फुग्यांचे स्लिव्हजसुद्धा फॅट आर्म्सना सुंदर दिसतात.
मोठ्या फुलांच्या डिझाईन्स किंवा मोठ्या प्रिंट्स टाळाव्यात. त्याऐवजी बारीक प्रिंट्स किंवा उभ्या रेषा असलेले कापड वापरावे. ज्यामुळे हात बारीक दिसण्यास मदत होते.
बाहीच्या काठांवर मोठी किंवा ठळक बॉर्डर लावणं टाळावं. कारण यामुळे लोकांचे लक्ष थेट दंडांकडे जाते. बारीक नाजूक लेस किंवा बिना बॉर्डरच्या बाह्या शिवणं अधिक चांगले ठरते.
गळ्याचा आकार व्ही, यू शेपमध्ये मोठा ठेवावा. यामुळे गळ्याकडे आणि चेहऱ्याकडे लक्ष वेधले जाते आणि दंडांकडील लक्ष कमी होते.
सध्या फॅशनमध्ये असलेले पफ स्लिव्हज जाड दंड असलेल्यांनी टाळावेत. कारण यामुळं दंड अधिकच जाड दिसू लागतात.