ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे ५० नवीन पॅटर्न्स; युनिक ब्लाऊज शिवा, साडीला स्टायलिश लूक येईल
Updated:September 6, 2025 17:06 IST2025-09-06T16:45:36+5:302025-09-06T17:06:08+5:30
Blouse Design Back Neck : हातांमध्ये किंवा ब्लाऊजच्या मागच्या पॅटर्नमध्ये नवीन टच हवा असेल तर असे ब्लाऊज डिजाईन ट्राय करू शकता.

साडी म्हटलं की त्यासोबत मॅचिंग ब्लाऊज आलं. सध्या फॅशनच्या दुनियेत साडीच नाही तर ब्लाऊजच्या डिजाईन्सनाही खूप महत्व प्राप्त झाले आहे. ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या डिजाईन्स साडीला नवीन लूक देतात. ब्लाऊज डिजाईन्सचे काही नवीन पॅटर्न्स पाहूया.(New 50 Blouse Design Back Neck )
मागच्या गळ्यात तुम्हाला गोल गळा, चोकोनी गळा, पान गळा, हॉल्टर नेक, डिप स्वेअर नेक, स्ट्रॅप्स गळा, जाळीचा गळा सुंदर दिसेल. (Blouse Design Back Neck)
कॉटनच्या किंवा काढापदराच्या सिल्कच्या साड्यांवर तुम्ही हे सिंपल, सुंदर गळे शिवू शकता. (Simple and easy)
मागे बटन्स लावण्याची फॅशन सध्या ट्रेंडीग आहे, तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला बटन्स लावून घेऊ शकता.
तुम्ही जसं पॅटर्न शिवाल त्यानुसार ब्लाऊजची शिलाई वाढते.हातांमध्ये किंवा ब्लाऊजच्या मागच्या पॅटर्नमध्ये नवीन टच हवा असेल तर असे ब्लाऊज डिजाईन ट्राय करू शकता.
कटवर्क, वेगवेगळे पॅचेच किंवा लेस लावून तुम्ही ब्लाऊजला छान लूक देऊ शकता.
एम्ब्रॉयडरी, नेट, डिप व्ही गळा, बोट नेक, जॅकेट किंवा कॉलर नेक,मल्टिपल स्ट्रिंग अशा डिजाईन्स ट्राय करू शकता.
जर तुम्ही बारीक असाल, बॅक फॅट जास्त असेल तर थोडे स्टायलिश ओपन गळे शिवू शकता
ब्लाऊजला मागे फुल शिवून घेण्याची फॅशनसुद्धा नवीन आहे. ऑर्गेंजा किंवा शिफॉन साड्यांवर तुम्ही असं पॅटर्न शिवू शकता.
सिंपल साडी असेल तर व्ही नेक गळा सुंदर दिसेल. यात सुद्धा तुम्हाला २० पेक्षा डिजाईन्स दिसतील.