रोज वापरण्यासाठी चांदीच्या पैंजणांचे १० नाजूक डिझाइन्स, पाय दिसतील शोभून-वापरताही येतील सहज
Updated:November 12, 2025 12:55 IST2025-11-12T12:38:06+5:302025-11-12T12:55:46+5:30
Beautiful Designs Of Payal : अनेक डिझाईन्समध्ये पारंपारीक नक्षी आणि अधुनिकता यांचा सुंदर मिलाप साधलेला असतो.

पैंजण (Silver Anklet) स्त्रियांच्या पायांची शोभा वाढवणारा एक महत्वाचा दागिना आहे. सध्या बाजारात अनेक नवीन, नाजूक आणि आकर्षक पैंजणांचे डिजाईन्स उपलब्ध आहेत. ज्यामुळे पैंजण घालण्याचा क्रेझ दिसून येतो. (Silver Payal Designs Light Weight Silver Payal)
सध्या जाडजूड पैंजणांऐवजी बारीक आणि नाजूक पट्ट्यांच्या डिजाईन्स जास्त पसंत केल्या जात आहेत.
एकाच पायात पैंजण घालण्याची फॅशन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. जी एक मॉडर्न लूक देते.
अनेक नवीन डिझाईनसध्ये घुंगरूचा आवाज कमी करण्यासाठी किंवा ते पूर्णपणे वगळण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे रोजच्या वापरासाठी आरामदायक ठरतात.
रंगेबीरंगी किंवा पांढऱ्या स्टोन्सनी जडववलेले पैंजण खूपच ट्रेंडी आणि आकर्षक दिसतात.
फुलांच्या नाजूक आकृत्या असलेले डिजाईन्स नेहमीच सुंदर आणि पारंपारीक लूक देतात.
लहान लटकन किंवा झुमके लावलेले पैंजण खास समारंभांसाठी अधिक उठून दिसतात.
लग्नसमारंभ किंवा हळदी समारंभासाठी कुंदन वर्क केलेले पैंजण खूपच उठावदार दिसतात.
चांदी, सोने आणि अन्य धातूंचे पैंजणही बाजारात उपलब्ध आहेत.
अनेक डिझाईन्समध्ये पारंपारीक नक्षी आणि अधुनिकता यांचा सुंदर मिलाप साधलेला असतो.