बांधणीच्या ब्लाऊजचे १० युनिक-ट्रेंडींग डिजाईन्स; एकदम साधी साडी असेल तरी लूक मॉडर्न
Updated:February 3, 2026 19:32 IST2026-02-03T12:48:27+5:302026-02-03T19:32:34+5:30
Bandhani Blouse patterns Designs : पाठीमागे मोठा मटका गळा काढून त्याला कापडी बटणं लावल्यास ब्लाऊज अधिकच उठून दिसतो.

बांधणीचे ब्लाऊज हे दिसायला अत्यंत पारंपारीक आणि सुंदर असतात. त्यांना मॉडर्न लूक देण्यासाठी तुम्ही खालील पद्धती वापरू शकता. (Bandhani Blouse patterns Designs)
बांधणीच्या कापडावर मटका गळा, पान गळा किंवा डिप राऊंड नेक उठून दिसतो. पाठीवर लटकन आणि गोंडे लावल्यास त्याला अधिक साजेसा लूक मिळतो. (10 Trending Bandhani Blouse Designs)
सध्या कोपरापर्यंतचे हात किंवा पफ स्लिव्हज खूपच ट्रेंडमध्ये आहेत. हाताच्या काठाला एखादी नाजूक गोटा पट्टी लेस लावल्यास बांधणीचा लूक अधिक खुलून येतो. (Blouse Designs Front Side)
जर ब्लाऊज साध्या डिझाईन्सचा असेल तर गळ्याला आणि हाताला गोल्डन किंवा सिल्वर लेस वापरा. यामुळे ब्लाऊजचा जड आणि रॉयल लूक मिळतो.
फिटींग आणि फिनिशिंगसाठी प्रिन्स कट शिवणं उत्तम ठरतं. ज्यामुळे बांधणीची प्रिंट व्यवस्थित दिसते आणि ब्लाऊज अंगात छान बसतं.
जर साडी पूर्णपणे बांधणीची असेल तर ब्लाऊजवर मिरर वर्कचं काम करून घेतल्यास ते अधिक आकर्षक दिसतं.
कॉटन बांधणीवर बोटनेक, व्ही नेक खूपच शोभून दिसते. यामुळे ब्लाऊजला एक फॉर्मल आणि क्लासी लूक मिळतो. जो ऑफिस किंवा कार्यक्रमांसाठी उत्तम ठरतो
पाठीमागे मोठा मटका गळा काढून त्याला कापडी बटणं लावल्यास ब्लाऊज अधिकच उठून दिसतो.
बांधणीच्या रंगाच्या विरुद्ध रंगाची साडी असेल तर पायपिंगसाठी गळ्याला आणि हाताला लावल्यानं डिझाईन स्पष्ट दिसते.
हाताच्या लांबीसाठी छोट्या बाह्या ठेवून त्यावर व्ही कट किंवा यु कट दिल्यास ते अधिक ट्रेंडी दिसेल.