मागच्या गळ्याच्या १० फॅन्सी, ट्रेंडींग डिझाईन्स; या पॅटर्नचं ब्लाऊज शिवा-सणासुधीला उठून दिसाल
Updated:January 4, 2026 16:42 IST2026-01-04T16:23:12+5:302026-01-04T16:42:07+5:30
Back Blouse Designs Fancy Patterns : पाठीवर ३ ते ४ आडव्या किंवा तिरप्या पट्ट्यांचे डिझाईन्स अधुनिक साड्यांवर खूपच उठून दिसतात.

फॅशनच्या दुनियेत दर काही दिवसांनी वेगवेगळे प्रयोग होत असतात. गेल्या काही महिन्यांत अधिक लोकप्रिय जालेल्या आणि २०२५-२६मध्ये ट्रेंडमध्ये असलेल्या काही हटके ब्लाऊज डिझाईन्स पाहूया. (Back Blouse Designs Fancy Patterns)
कॉर्सेट बॅक पाश्चात्य कोर्सेटप्रमाणे ब्लाऊजच्या पाठीणीर क्रॉस-क्रॉस दोऱ्यांची डिझाईन्स खूप चर्चेत आहे. हे डिझाईन फिटिंगला उत्तम असते अतिशय बोल्ड लूक देते. (New Back Blouse Designs)
पाठीवर ३ ते ४ आडव्या किंवा तिरप्या पट्ट्यांचे डिझाईन्स अधुनिक साड्यांवर खूपच उठून दिसतात. (Latest Back Blouse Designs)
गळ्याचा आकार साधा असला तरी त्याच्या कडा लाटांसारख्या वळणदार कापल्या जातात. हे डिझाईन्स नाजूक आणि मोहक दिसतात.
गळ्याचा आकार दोन्ही बाजूंनी सारखा न ठेवाता एका बाजूनं खोल आणि दुसऱ्या बाजूनं बंदिस्त ठेवणं हा नवीन प्रयोग आहे.
साध्या दोऱ्यांऐवजी आता सोन्याचे किंवा चांदीचे छोटे चार्म्स, घुंगरू किंवा फॅब्रिक्सपासून बनवलेले फुलं लटकन म्हणून वापरले जातात.
ब्लाऊजचा मागचा गळा जर तुम्हाला जास्त बंद किंवा जास्त ओपन नको असेल तर तुम्ही या पद्धतीचा साधा, गळा शिवू शकता.
पाठीचा पूर्ण भाग पारदर्शक ऑर्गेंझा कापडाचा असून त्यावर मधोमध एखादं मोठं फ्लोरल पॅच किंवा हातानं केलेली पेंटींग सध्या खूपच ट्रेंडींग आहे.
फुग्यांचे हात शिवून तुम्ही मागच्या गळ्याला या प्रकारचे छोटे छोटे गोंडे लावू शकता.
संक्रांतीसाठी तुम्ही काळी साडी घेणार असाल तर त्यावर असं काळं ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यामुळे लूक अधिकच खुलून येईल.