लग्न सोहळण्यासाठी खास येवला पैठणी, १० आकर्षक रंग, डबल पिकॉक डिझाइनचं ब्लाऊजही शोभते खास
Updated:February 18, 2026 18:47 IST2026-02-18T13:29:36+5:302026-02-18T18:47:52+5:30
A Special Yeola Paithani For Wedding Season : पारंपारीक दागिने कपाळावर चंद्रकोर आणि हे डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊज घालून तुम्हाला कोणत्याही मंगल कार्यात एखाद्या राणीसारखे मिरवता येईल.

लग्नसराईसाठी खास असलेल्या येवला पैठणी आणि डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊज सध्या खूपच ट्रेंडींग आहे. (Yeola Paithani With Double Peacock Blouse Design)
महाराष्ट्राच्या परंपरेच्या मानबिंदू असलेली येवला पैठणी तिच्या मुलायम रेशमी पोत आणि आकर्षक जरतारी काठांसाठी जगप्रसिद्ध आहे. (A Special Yeola Paithani For Wedding Season)
या पैठणी प्रामुख्यानं पारंपारीक पोपट, फुलं आणि वेलींचे सुबक विणकाम केलेले असते. जे लग्नसराईत नववधूचे सौंदर्य अधिकच खुलवते.
या पैठणीला अधुनिक आणि रॉयल लूक देण्यासाठी सध्या डबल पिकॉक असलेले आरी वर्क ब्लाऊज अत्यंत लोकप्रिय ठरत आहेत.
ब्लाऊजच्या पाठीवर आणि हातावर सुईच्या साहाय्यानं आरी वर्क केलेले मोरांचे डिझाईन्स अत्यंत उठावदार आणि रिच वाटते.
या आरी वर्कमध्ये सोनेरी जरी, मणी,रेशमी धागे आणि कुंदनचा वापर केल्यामुळे ब्लाऊज एक प्रकारची चमक प्राप्त होते.
पारंपारीक पैठणीला अधुनिक डिझायनर लूक हवा असेल तर डबल पिकॉक आरी वर्क हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. जो जुन्या परंपरेला नवीन फॅशनची जोड देतो.
गडद लाल, हिरवा जांभळा किंवा राणी गुलाबी अशा पैठणीच्या रंगावर हे जड कामाचे कोणत्याही सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून जातात.
पारंपारीक दागिने कपाळावर चंद्रकोर आणि हे डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊज घालून तुम्हाला कोणत्याही मंगल कार्यात एखाद्या राणीसारखे मिरवता येईल.
येवला पैठणी आणि त्यावर हातानं केलेली जड आरी वर्क हे केवळ एक वस्त्र नसून एक राजेशाही वारसा आहे. जो लग्नाच्या मांडवात नववधूला एक वेगळी ओळख मिळवून देतो.
आरी वर्कचे ब्लाऊज हे खास मापाप्रमाणे शिवले जात असल्यामुळे पैठणीचा डौल अधिक सुबक दिसतो आणि शरीराल एक योग्य आकार मिळतो.