सिल्व्हर स्टोन नेकलेसच्या ८ डिझाईन्स; साडी असो वा ड्रेस गळ्यात उठून दिसेल सुंदर नेकलेस
Updated:January 19, 2026 15:16 IST2026-01-19T14:45:49+5:302026-01-19T15:16:27+5:30
8 Designs of Silver Stone Necklace : जर तुमचा नेकलेस खूपच हेवी असेल तर कानतले छोटे निवडा. जेणेकरून पूर्ण लक्ष नेकलेसवर जाईल.

सध्या स्टोनचे नेकलेस महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून ते कोणत्याही साध्या लूकला रॉयल लूक देतात. (Stone Work Necklace Designs)
यामध्ये प्रामुख्यानं कुंदन, अमेरीकन डायमंड आणि रंगीत खड्यांचा वापर केला जातो. जे दिसायला खूपच आकर्षक दिसतात.
पैठणी, सिल्क किंवा नेटच्या साड्यांवर हे नेकलेस परिधान केल्यास पारंपारीक आणि मॉडर्न असा सुंदर मेळ बसतो.
गाऊन किंवा इंडो वेस्टर्न ड्रेसवर स्टोनचे चोकर किंवा पेंडंट असलेले नेकलेस खूपच स्टायलिश दिसतात.
ड्रेस किंवा साडीच्या रंगाशी सुंसंगत असे मॅचिंग खडे किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे स्टोन निवडल्यास तुमचा लूक अधिक खुलून येतो.
हे नेकलेस वजनाला हलके असल्यामुळे दीर्घकाळ घालण्यासाठी सोयीस्कर ठरतात आणि त्यांची चमकही टिकून राहते.
सध्या मल्टी लेअर स्टोन माळा आणि मोठ्या खड्यांचे स्टेटमेंट नेकलेस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
जर तुमचा नेकलेस खूपच हेवी असेल तर कानतले छोटे निवडा. जेणेकरून पूर्ण लक्ष नेकलेसवर जाईल.