साडी असो की ड्रेस-शोभून दिसतात वेलवेटच्या बांगड्या-पाहा ८ रंग, तुमचा लूकच बदलून जाईल
Updated:January 7, 2026 16:31 IST2026-01-07T16:00:54+5:302026-01-07T16:31:38+5:30
8 Colors Of Velvet Bangles Sets : दिसायला जरी हे सेट भरगच्च असले तरी ते वजनानं खूपच हलके असतात.

वेलवेटच्या बांगड्या आणि बारीक स्टोन्सच्या चंदेरी बांगड्यांचे कॉम्बिनेशन सध्या खूपच लोकप्रिय आहे. (8 Colors Of Velvet Bangles Sets)
वेलवेटच्या बांगड्यांना एक प्रकारचा मखमली आणि राजेशाही लूक असतो जो कोणत्याही पारंपारीक पोशाखांवर उठून दिसतो.
यात वापरल्या जाणाऱ्या चंदेरी रंगाच्या बारीक स्टोन्सच्या बांगड्या सेटला एक वेगळीच चमक आणि अधुनिक टच देतात.
हे सेट्स लाल, हिरवा,राणी कलर, ब्लू, ग्रे असा गडद आणि सौम्य दोन्ही कलर कॉम्बिनेशन्समध्ये मिळतात.
तुम्ही तुमच्या साडीच्या किंवा ड्रेसच्या रंगांनुसार वेलवेटच्या बांगड्या निवडून त्यामध्ये चंदेरी खड्यांच्या बांगड्यांची हवी तशी मांडणी करु शकता.
हे सेट्स लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा घरगुती कार्यक्रमांसाठी अतिशय उत्तम पर्याय ठरतात.
दिसायला जरी हे सेट भरगच्च असले तरी ते वजनानं खूपच हलके असतात. ज्यामुळे दिवसभर वापरताना त्रास होत नाही.
चंदेरी स्टोन्समुळे या बांगड्यांना डायमंडसारखा लूक मिळतो. जो सोन्याच्या दागिन्यांसोबतही छान मॅच होतो.