छोट्या आणि मोठ्या मंगळसुत्राचे ८ सुंदर ट्रेंडी सेट्स; गळ्यात शोभून दिसतील अशा युनिक डिझाईन्स
Updated:February 10, 2026 16:08 IST2026-02-09T16:29:56+5:302026-02-10T16:08:16+5:30
8 Beautiful Trendy Sets Of Mangalsutra : मोठ्या मंगळसूत्रासाठी लक्ष्मी हार किंवा मोर डिझाईन्स वापरल्या जातात तर छोट्या मंगळसूत्रासाठी छोटे हिरे किंवा सोन्याचा नाजूक मणी वापरला जातो.

मंगळसूत्र हे विवाहीत स्त्रियांच्या सौभाग्याचे लेणं असून या सेटमुळे परंपरा आणि अधुनिकता यांचा सुरेख संगम साधता येतो. (Short And Long Mangalsutra Sets)
या सेटमध्ये प्रामुख्याने एक लांब आणि एक आखूड मंगळसूत्र असते जे वेगवेगळ्या प्रसंगांनुसार वापरता येते. (8 Beautiful Trendy Sets Of Mangalsutra)
मोठं मंगळसूत्र साधारपणपणे २४ ते ३० इंच लांब असते. यात दोन वाट्यांचे पारंपारीक पेंडंट किंवा जड कलाकुसरीचे डिझाईन्स असतात.
छोटे मंगळसूत्र १६ ते १८ इंच लांब असतात. हे अत्यंत हलके आणि डेली वेअरसाठी सोयीचे असतात. जे गळ्यात उठून दिसतात.
दोन्ही मंगळसूत्रांमध्ये काळे मणी आणि सोन्याचे मणी यांचा वापर केला जातो. आजकाल मल्टी लेअर किंवा दुहेरी सरीच्या डिझाईन्सना अधिक पसंती दिली जात आहे.
मोठ्या मंगळसूत्रासाठी लक्ष्मी हार किंवा मोर डिझाईन्स वापरल्या जातात तर छोट्या मंगळसूत्रासाठी छोटे हिरे किंवा सोन्याचा नाजूक मणी वापरला जातो.
सण-समारंभाला मोठे मंगळसूत्र साडीवर शोभून दिसते तर ऑफिस किंवा प्रवासात छोटे मंगळसूत्र कुर्ती किंवा वेस्टर्न कपड्यांवर सोयीचे ठरते.
सोन्याच्या वाढत्या किमतीचा विचार करता असा सेट घेणं. गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय ठरतो.