लग्नसराई स्पेशल : पाहा फॅशनेबल ब्लाऊजच्या बाह्यांच्या ६० ट्रेंडी डिझाईन्स; साधी साडीही दिसेल शाेभून
Updated:March 18, 2026 17:09 IST2026-03-18T16:26:32+5:302026-03-18T17:09:01+5:30
60 Trendy Blouse Sleeve Designs : यंदाच्या लग्नसराईत स्वत:ला आकर्षक दाखवण्यासाठी तुम्ही हे पॅटर्न्स नक्की ट्राय करू शकता.

सध्याच्या लग्नसराईत ब्लाऊच्या बाह्याचे नवीन डिझाईन्स बरेच ट्रेंडींग आहेत. जे तुमच्या लूकला रॉटल टच देतात. (Blouse Sleeves Patterns)
कट वर्क आणि लटकन डिजाईन्स सध्या ब्लाऊजमध्ये दिसून येतात. मणी किंवा बो स्टाईलचे लटकनसुद्धा ट्रेंडमध्ये आहे. (Latest Blouse designs)
फुगीर बाह्या पुन्हा चर्चेत आल्या असून त्याखाली नक्षीदार बॉर्डर लावल्यामुळे हात अधिक सुबक दिसतात.
रफल स्टाईल स्लिव्हज मॉर्डन आणि पारंपारीक दोन्ही साड्यांवर उठून दिसते.
पेस्टल रंगांच्या ब्लाऊजवर मोत्यांच्या माला किंवा लटकन लावल्यानं एक नाजूक आणि मोहक लूक मिळतो.
हे डिझाईन्स केवळ पैठणी किंवा सिल्क साड्यांवरच नाही तर नेट आणि शिफॉन साड्यांवरही सुंदर दिसतात.
यंदाच्या लग्नसराईत स्वत:ला आकर्षक दाखवण्यासाठी तुम्ही हे पॅटर्न्स नक्की ट्राय करू शकता.
तुम्हाला थ्री-फोर स्लिव्हजचे ब्लाऊज हवे असतील तर अशा प्रकारचे ब्लाऊजेस हा उत्तम पर्याय आहे.
जर तुम्हाला बलून स्लिव्हजपेक्षा प्लेटींग्स हव्या असतील तर अशा प्रकारचे प्लेटिंगतुम्ही ब्लाऊजच्या स्लिव्हजवर करू शकता.
स्लिव्हजवर लटकणारे मोती आणि गोल्डन लेस ब्लाऊजला रिच आणि सुंदर लूक देतात.