कुमारिका पुजनाला मुलींना काय गिफ्ट द्यावं? घ्या ५ पर्याय- आवडीची वस्तू पाहूनच कुमारिका होतील खुश..
Updated:September 22, 2025 17:16 IST2025-09-22T17:08:28+5:302025-09-22T17:16:07+5:30

नवरात्रीमध्ये बहुतांश घरांमध्ये कुमारिका पुजन केले जाते. या पुजनाला नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे.
कुमारिकांना आपल्या घरी बोलवायचे, त्यांची पुजा करायची, ओटी भरायची आणि काहीतरी भेटवस्तू द्यायची असा हा कार्यक्रम असतो. अशावेळी मुलींना नेमकं काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न अनेकजणींना पडतो. म्हणूनच पाहा हे काही खास पर्याय..
एखादं छोटंसं गळ्यातलंही तुम्ही कुमारिकांना देऊ शकता. त्यातल्या त्यात लेटेस्ट फॅशनचं गळ्यातलं कोणतं आहे ते एकदा बघून घ्या आणि तशा पद्धतीने त्यांना गिफ्ट द्या.
कुमारिकांना तुम्ही सुकामेव्यापासून बनवलेले लाडू, चॉकलेट भेट म्हणून देऊ शकता. चॉकलेट पाहताच लहान मुली आनंदून जातात.
शालेय साहित्य ठेवण्यासाठी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच मुलींना आवडतच असतात. असं एखादं पाऊच त्यांना भेट म्हणून द्या.
जर तुमच्याकडे येणाऱ्या कुमारिका वयाने खूपच लहान असतील तर त्यांना बाहुली किंवा बार्बी गिफ्ट म्हणून द्या. बाहुली, बार्बी हे पाहून मुलींना नेहमीच आनंद होतो.
कस्टमाईज पेनदेखील तुम्ही मुलींना देऊ शकता. त्यांचं नाव टाकलेले पेन पाहिले, तर त्या नक्कीच खुश होतील.