मराठी महिलांकडे असायलाच हव्या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या ५ साड्या, लग्नसराईत यातली एखादी नक्की घ्या..

Updated:November 11, 2025 14:59 IST2025-11-11T14:49:14+5:302025-11-11T14:59:12+5:30

मराठी महिलांकडे असायलाच हव्या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या ५ साड्या, लग्नसराईत यातली एखादी नक्की घ्या..

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भरजरी साड्यांची खरेदी या दिवसांत आवर्जून केलीच जाते.

मराठी महिलांकडे असायलाच हव्या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या ५ साड्या, लग्नसराईत यातली एखादी नक्की घ्या..

कांजीवरम, बनारसी, गढवाल सिल्क, नल्ली सिल्क, धर्मावरम, संबळपुरी अशा साड्या या दिवसांत खूप चालतात. महाराष्ट्राची पैठणीही या लोकप्रिय साड्यांच्या यादीत आहेच. पण त्यासोबतच महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या इतर साड्याही लग्नसराईत तुम्ही घेऊ शकता. त्या नेमक्या कोणत्या ते पाहूया..

मराठी महिलांकडे असायलाच हव्या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या ५ साड्या, लग्नसराईत यातली एखादी नक्की घ्या..

त्या साड्यांच्या यादीमध्ये पैठणीचा सगळ्यात पहिला नंबर येतो. महाराष्ट्राची ओळख सांगणारी पैठणी आज जगभरात गाजत आहे. तिच्यावरील बुटी आणि तिचे काठ ही तिची ओळख आहे. लोटस पैठणी, मुनिया पैठणी असे त्यात कित्येक प्रकार असून मुळ पैठणी अतिशय महाग मिळते. पण सेमी पैठणी, सॉफ्ट सिल्क या प्रकारातही ती मिळते आणि त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडू शकते.

मराठी महिलांकडे असायलाच हव्या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या ५ साड्या, लग्नसराईत यातली एखादी नक्की घ्या..

हिमरू साडी ही मुळची महाराष्ट्रातल्या औरंगाबादची म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजी नगरची. मोहम्मद बिन तुघलक याच्या राजवटीत हिमरू कला सुरू झाली असं म्हणतात. रेशीम आणि कापूस यांच्या धाग्यातून हिमरूची निर्मिती होते आणि ती अतिशय तलम असते. या साडीवर जे नक्षीकाम असतं त्यावर फारसी डिझाईन्सचा प्रभाव दिसून येतो. अतिशय बारीक आणि गुंतागुंतीचं विणकाम म्हणून हिमरू कला, हिमरू साडी ओळखली जाते.

मराठी महिलांकडे असायलाच हव्या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या ५ साड्या, लग्नसराईत यातली एखादी नक्की घ्या..

इरकल साडी ही मुळची कर्नाटकच्या इलकल शहराची असली तरी महाराष्ट्रातही ही साडी खूप पुर्वीपासून विणली जाते. सुती धाग्यांमध्ये असणारी इरकल आता सिल्क प्रकारातली मिळते आणि तिची किंमत ७ हजारपेक्षा जास्तच असते. सिल्क इरकल साडीला लग्नसराईच्या दिवसांत खूप मागणी असते.

मराठी महिलांकडे असायलाच हव्या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या ५ साड्या, लग्नसराईत यातली एखादी नक्की घ्या..

खन साडी ही सुद्धा महाराष्ट्रातली एक पारंपरिक साडी म्हणून ओळखली जाते. ८ व्या शतकात या साडीची निर्मिती सुरू झाली असावी असं मानलं जातं. वरवर पाहिलं तर खण साडी आणि इरकल या सारख्याच वाटत असल्या तरी त्यांची विणकामाची धाटणी पुर्णपणे वेगळी असते. इरकल साडीचा मुख्य भाग प्लेन असतो. तर खण साडीचा मुख्य भागही दोन रंगाच्या धाग्यांमध्ये विणला जातो.

मराठी महिलांकडे असायलाच हव्या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या ५ साड्या, लग्नसराईत यातली एखादी नक्की घ्या..

नारायण पेठ हा देखील साडीचा एक अतिशय सुंदर आणि देखणा प्रकार. लग्नसराईत या साडीला विशेष मागणी असते. तिचे आकर्षक आणि मोठे काठ ही तिची ओळख आहे. काही साड्या प्लेन असतात तर काही साड्यांवर बुटी असते. ही साडी अतिशय तलम आणि वजनाला हलकी असते. त्यामुळे कॅरी करायला ती सोपी जाते.