नथीचा नखरा! लग्नसराईत काठपदराची साडी नेसल्यावर घालायलाच हवी नथ, पाहा १० नवीन नथ डिजाइन्स
Updated:December 10, 2024 16:53 IST2024-12-10T12:11:03+5:302024-12-10T16:53:51+5:30
10 Types Of Maharashtrian Nath Designs : अनेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतींच्या नथ घातल्या जातात.

लग्नसराई किंवा कोणताही खास कार्यक्रम म्हटलं की नथ आलीच. नथ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं काठा पदराच्या साडीवर घालू शकता.
नथ हा मराठमोळा खास दागिना घातल्याशिवाय साडीचा पारंपारीक लूक पूर्ण होत नाही. नथीच्या नवीन डिजाईन्स पाहूया.
नथ हा दागिना फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून अनेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतींच्या नथ घातल्या जातात. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी नथ अनेक प्रकारची असते.
महाराष्ट्रीयन नथींना मुखंडा देखिल म्हणतात. नथीचे वेगवेगळे प्रकार आहेत. यात तुम्ही आपल्या पतीचे नावही लिहू शकता किंवा अहो लिहू शकता.
बानू नथ, कारवारी नथ, पेशवाई नथ, पुणेरी नथ, बाजीराव मस्तानी नथ, मोती नथ, मल्हारी कारवारी नथ असे नथीचे अनेक प्रकार आहेत.
यापेक्षा वेगळा पर्याय म्हणजे तुम्ही पाजूची नथही घालू शकता.
गोल्डन मण्यांची नथ त्यात मोती हे कॉम्बिनेशन नेहमीच उत्तम दिसतं.
२०० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला नथीच्या खास प्रकार दिसून येतील.
जर तुम्हाला भरगच्च नथ हवी असेल तर तुम्ही अशी डिजाईन ट्राय करू शखता.
नथीत व्हाईट, ट्रांसपरेंट स्टोनमुळे नवीन लूक येतो.