World Music Day 2025: 'ही' गाणी क्षणार्धात एनर्जी बूस्ट करतील; आळस, नैराश्य, मरगळ पळवून लावतील!

Updated:June 21, 2025 13:39 IST2025-06-21T13:13:08+5:302025-06-21T13:39:46+5:30

World Music Day 2025: संगीत ही संजीवनी आहे असे म्हटले जाते. अशातच आपल्याकडे तर गाण्यांचा भला मोठा खजिना आहे. जन्मापासून मरणापर्यंत हर तऱ्हेच्या रचना आहेत, त्याही साग्रसंगीत! प्रत्येक मूडप्रमाणे, औचित्याप्रमाणे गाणी तयार आहेत आणि आता तर एका क्लिकवर ती उपलब्ध आहेत. आज जागतिक संगीत दिनानिमित्त(World Music Day 2025) एनर्जी बूस्ट करणाऱ्या गाण्यांची यादी तयार करूया.

World Music Day 2025: 'ही' गाणी क्षणार्धात एनर्जी बूस्ट करतील; आळस, नैराश्य, मरगळ पळवून लावतील!

कोणत्या वेळी कोणते गाणे ऐकावे याची जाण असावी. अन्यथा मूड ऑफ असताना 'लंबी जुदाई' वगैरे ऐकाल तर आणखी रडू कोसळेल, तेही अकारण! त्यामुळे मरगळ, आळस, नैराश्य झटकून उत्साह संचारेल अशी कोणती गाणी आहेत ते पाहू! ही गाणी तुम्हाला मूड चेंज करण्यासाठी, मूड लिफ्टिंगसाठी, आळस झटकण्यासाठी, वर्कआउट करण्यासाठी, अपयशावर मात करून नव्या जोमाने काम सुरु करण्यासाठी नक्कीच मदत करतील.

World Music Day 2025: 'ही' गाणी क्षणार्धात एनर्जी बूस्ट करतील; आळस, नैराश्य, मरगळ पळवून लावतील!

हे गाणं आत्मशक्ती आणि जिद्द दाखवतं. मिल्खा सिंह यांच्या जीवनातील संघर्ष दाखवतो. गाण्याचे शब्द तर जोश देतीलच शिवाय याचे संगीत मरगळलेल्या मनाला तजेला देतील, डोक्याला झिणझिण्या देतील, क्षणात तुमची एनर्जी अप होईल आणि सकारात्मकता जाणवेल.

World Music Day 2025: 'ही' गाणी क्षणार्धात एनर्जी बूस्ट करतील; आळस, नैराश्य, मरगळ पळवून लावतील!

हा अतिशय प्रेरणादायक ट्रॅक आहे. जेव्हा दिशाहीन प्रवास सुरु आहे असे वाटू लागते त्यावेळी अशी ध्येयासाठी प्रेरित करणारी गाणी ऐकली आणि त्याच्या अर्थपूर्ण शब्दांकडे लक्ष्य दिले की अपयशावर मात करण्याचे बळ संचारते.

World Music Day 2025: 'ही' गाणी क्षणार्धात एनर्जी बूस्ट करतील; आळस, नैराश्य, मरगळ पळवून लावतील!

हार मानू नका, उभं राहा आणि पुन्हा लढा, असा संदेश देणारं दमदार गाणं. चित्रपट माहितीचा आहेच, पण गाण्याचे शब्द आणि संगीत आपल्याला आपल्या आयुष्याची स्पर्धा जगण्यासाठी प्रेरणा देतील. देशभक्ती जागृत करतील.

World Music Day 2025: 'ही' गाणी क्षणार्धात एनर्जी बूस्ट करतील; आळस, नैराश्य, मरगळ पळवून लावतील!

आशावादाचं प्रतीक असणारं हे गाणं. एक मूकबधिर मुलगा क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहतो. तो स्टार होतो. आपल्या प्रतिकूलतेवर मात करतो. त्याप्रमाणे आपणही आपल्या अडचणींवर मात करून पुढे जाऊ शकतो ही प्रेरणा या गाण्यातून मिळते.

World Music Day 2025: 'ही' गाणी क्षणार्धात एनर्जी बूस्ट करतील; आळस, नैराश्य, मरगळ पळवून लावतील!

देशभक्ती जागृत करणारे हे गाणे कधीही ऐका, वाटल्यास रोज ऐका. त्यामुळे तुम्ही उत्साही राहाल. आपल्यापुरता विचार न करता देशासाठी आपण काय करू शकतो याचा विचार कराल आणि कृतीदेखील करा. अशी गाणी प्रत्येक भारतीयाने रोज ऐकली तरच देशप्रेम ओसरणार नाही.

World Music Day 2025: 'ही' गाणी क्षणार्धात एनर्जी बूस्ट करतील; आळस, नैराश्य, मरगळ पळवून लावतील!

दंगल हा मुव्ही जितका प्रेरणादायी आहे तेवढीच त्यातली ही दोन गाणी एव्हरग्रीन आहेत. मुलींची जिद्द आणि त्यांच्या वडिलांचे स्वप्न हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातले चित्र आहे. जर आपण आपल्या स्वप्नांपासून दूर गेलो असू तर त्याची जाणीव करून देणारी ही गाणी स्ट्रेसबस्टर ठरतील.