तुम्हालाही सतत गोड खाण्याची इच्छा होतेय का? शरीरात 'या' व्हिटॅमिनची असेल कमतरता
Updated:December 30, 2024 17:15 IST2024-12-30T17:04:10+5:302024-12-30T17:15:55+5:30
शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास व्यक्तीला गोड खावंसं वाटू लागतं.

अनेक वेळा माणसाला गोड खाण्याची इच्छा होते. पण असं जर वारंवार घडत असेल तर ते नेमकं का घडत आहे याचा देखील विचार करायला हवा.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास व्यक्तीला गोड खावंसं वाटू लागतं. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होऊ शकतं हे जाणून घेऊया...
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी म्हणजेच B1 (थियामिन), B3 (नियासिन), B5 (पॅन्टोथेनिक ऍसिड), B6 (पायरीडोक्सिन) ची कमतरता असेल तर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल.
जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्हाला मिठाई किंवा गोड पदार्थ पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात.
एखाद्या व्यक्तीच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये चढ-उतार असल्यास गोड खाण्याची इच्छा वाढते.
एखाद्या व्यक्तीचे हार्मोन्स असंतुलित असल्यास त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. त्यामुळे देखील अशी इच्छा वाढू शकते.
एखाद्या महिलेला मासिक पाळी आणि मेनोपॉज दरम्यान गोड खावंसं वाटू शकतं.
जास्त गोड खाणं हे शरीरासाठी घातक ठरू शकतं. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणासारखे धोकादायक आजार होऊ शकतात.
बहुतेक लोकांना असं वाटतं की साखरच गोड असते. हे पूर्णपणे खरं नसलं तरी दैनंदिन जीवनात साखरेव्यतिरिक्त कोल्ड्रिंक्स, कुकीज, बिस्किटे आणि ब्रेड यांसारख्या गोष्टींमध्येही भरपूर साखर असते.