जरा वाढली की तुळस लगेच सुकते? हा १ घरगुती उपाय करा, डेरेदार होईल तुळस
Updated:January 19, 2026 13:10 IST2026-01-18T23:08:03+5:302026-01-19T13:10:29+5:30
Use Black pepper For Tulsi Plant : तुळशीच्या मुळांना बुरशी लागण्याची शक्यता असते. काळ्या मिरीतील एंटी फंगल गुणधर्म मुळांचे संरक्षण करतात.

प्रत्येक घरात तुळशीचं रोप असतं. तुळशीला फक्त धार्मिकदृष्ट्या महत्व नसते तर तब्येतीच्या दृष्टीनंही तुळस फायदेशीर मानली जाते. (Use Black pepper For Tulsi Plant)
पण थंडीच्या दिवसांत तुळशीचं रोप व्यवस्थित वाढत नाही. रोप लवकर कोमेजतं अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते. तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरतील. (Make Natural Fertilizer Of Black pepper For Tulsi Plant)
काळ्या मिरीचा वापर, तुळशीच्या रोपाच्या वाढीसाठी एक नैसर्गिक खत म्हणूनही अत्यंत प्रभावी ठरतो.
काळ्या मिरीत असलेल्या पिपरीन या घटकामुळे तुळशीवर पडणारे बारीक कीटक, मावा किंवा मुंग्या दूर राहण्यास मदत होते.
तुळशीच्या मुळांना बुरशी लागण्याची शक्यता असते. काळ्या मिरीतील एंटी फंगल गुणधर्म मुळांचे संरक्षण करतात.
मिरीची पूड मातीत मिसळल्यानं मातीची सुपीकता वाढते आणि झाडाला आवश्यक सुक्ष्म पोषक तत्व मिळतात.
काळ्या मिरीच्या वापरामुळे तुळशीच्या रोपाची अंतर्गत रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ज्यामुळे रोप प्रतिकूल हवामानातही टिकून राहते.