‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

Updated:February 20, 2025 17:05 IST2025-02-20T16:55:57+5:302025-02-20T17:05:03+5:30

Top 5 Plant that can survive without water : 5 Plants That Can Survive Without Water For Weeks : 5 plants that can survive without water for long periods : पाण्याशिवाय बराच काळ जिवंत राहू शकणाऱ्या आणि बरीच वर्षे टिकणारी 'ही' ५ रोपं आजच घराच्या बाल्कनीत लावा...

‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

आपल्यापैकी बरेचजण गार्डन किंवा घराच्या (Top 5 Plant that can survive without water) बाल्कनीत वेगवेगळ्या प्रकारची रोपं, झाडं लावतात. या रोपांची आपल्याला वेळोवेळी (5 plants that can survive without water for long periods) तितकीच योग्य ती काळजी घ्यावी लागते. प्रत्येक ऋतूनुसार त्यांची देखभाल देखील करावी लागते. रोपांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी आवश्यक असतात. रोपांना जर वेळेवर योग्य प्रमाणांत पाणी मिळाले नाही तर ती कोमेजून - सुकून जातात.

‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

बरेचदा आपण कामानिमित्त किंवा (5 Plants That Can Survive Without Water For Weeks) इतर काही कारणांसाठी घराबाहेर असतो. अशावेळी रोपांना पाणी न मिळाल्याने रोपं सुकतात. काही रोपांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर ती सुकून मरून जातात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या गार्डनमध्ये अशा काही रोपांची लागवड करु शकतो ज्यांना फारशा पाण्याची गरजच नसते, किंवा खूप कमी प्रमाणांत पाणी लागते. पाण्याशिवाय बराच काळ जिवंत राहू शकणाऱ्या आणि बरीच वर्षे दीर्घकाळ टिकणारी रोपं कोणती ते पाहूयात.

‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

स्नेक प्लांटला फारच कमी प्रमाणांत पाणी लागते. स्नेक प्लांट ही वनस्पती रात्री ऑक्सिजन सोडते आणि हवा शुद्ध करते. स्नेक प्लांटला जास्त काळ पाणी न दिल्यासही ती जिवंत राहू शकते. येत्या उन्हाळ्यात देखील आपण स्नेक प्लांटचे रोपं लावू शकतो.

‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

रबर प्लांटला खूपच कमी प्रमाणांत पाणी लागते. रबर प्लांट घरातील हवा शुद्ध करण्याचे महत्वाचे काम करते आणि हवेतील हानिकारक वायू शोषून घेते. रबर प्लांट भरपूर प्रमाणात ऑक्सिजन बाहेर सोडतो. तुम्ही रबर प्लांटचे रोपं घराच्या आत देखील सहज लावू शकता. रबर प्लांटचे रोपं खूप कमी पाण्यात अगदी सहज वाढते.

‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

पाण्याशिवाय बराच काळ जगू शकणाऱ्या वनस्पतींच्या यादीत कोरफडच्या रोपाचाही समावेश होतो. कोरफडीला खूप कमी पाणी लागते. आपल्या सगळ्यांच्याच घरात कोरफडीचे एक तरी रोपं असतेच. वर्षानुवर्षे कोरफड सहज पाण्याशिवाय वाढत राहते.

‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

जेड प्लांटला 'मनी ट्री' असेही म्हणतात. जेड प्लांटचे रोपं पाण्याशिवाय बरेच दिवस जगू शकते. जेड प्लांट भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतं आणि त्याच्या आसपासची हवा शुद्ध ठेवण्यासाठी मदत करतं.

‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

खूप कमी पाण्यात वाढणारे सागो पामचे रोपं दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक असते. सागो पामच्या रोपाची खूपच कमी काळजी घ्यावी लागते. सागो पामची खूप काळजी घेण्याची गरज नसते. कमीतकमी लक्ष देऊनही ते खूप चांगलं वाढतं. त्यामुळे ज्यांना गार्डनिंगची आवड आहे पण रोपांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, अशांसाठी ते एक चांगला पर्याय आहे. सागो पाम प्लांटला खूप जास्त पाणी घालण्याची गरज नसते. त्यामुळे तुम्ही अधूनमधून त्याला पाणी घालायला विसरलात तरी काही होत नाही.