महक उठेगा घर आंगन! कमी जागेत लावा ८ फुलझाडं, दरवळेल सुगंध-बहार येईल घरात!
Updated:April 8, 2025 14:37 IST2025-04-08T14:29:51+5:302025-04-08T14:37:10+5:30
Plant 8 flower plants in a small space, the fragrance will spread : लहान जागेतही फुले बहरतील. कुंडीत लावता येतात ही फुलझाडे. काळजीही कमी घ्यावी लागते.

आपल्याला झाडे लावायला तर आवडतात, मात्र जागेचा प्रश्न असतो. इमारतीमध्ये फ्लॅट असेल किंवा घराच्या आजूबाजूला जागा नसेल तर मग झाडे लावता येत नाहीत.
बरेचदा आपण झाड लावतो आणि नंतर योग्य तेवढी काळजी घेत नाही. काही झाडे अशी असतात ज्यांना भरपूर देखभालीची गरज असते. मात्र काहींना कमी कष्टातही वाढवता येते.
तुम्हाला घरात छान फुलांचा सुगंध दरवळलेला आवडत असेल तर, फुलझाडे लावायला नक्कीच आवडतील. या काही रोपांना अति काळजीची गरज नसते त्यांची ती वाढतात. जागाही कमी व्यापतात.
मोगऱ्याचा वास फार सुंदर येतो. तसेच मोगरा बाल्कनीमध्ये लावायला काहीच हरकत नाही. वेळोवेळी पाणी घालायचे. बाकी काही काळजी घ्यावी लागत नाही.
जास्वंदाचे अनेक प्रकार असतात. त्यातील काही बाल्कनी किंवा गॅलरीमध्ये अगदी आरामात वाढतात. मात्र महिन्यातून एकदा तरी फांद्या कापाव्या लागतात. बाकी काही काळजी घ्यावी लागत नाही.
अनंताचे बोनसाई रुपी झाड लावता येते. अनंताचे झाडे तसे मोठे असते. अंगणात लावावे लागते. मात्र अनंताचे बोनसाई झाड बाल्कनीमध्ये आरामात वाढते. छान फुलतेही.
अनेक प्रकारची आणि रंगाची सदाफुलीची रोपे नर्सरीमध्ये मिळतात. सदाफुली छान रंगीत आणि टवटवीत दिसते. काळजीही भरपूर घ्यावी लागत नाही.
चमेलीचे फुलही कमी जागेत वाढू शकते. पाणीही जास्त लागत नाही. सूर्यप्रकाश चांगला मिळेल याची काळजी घ्या.
जुईच्या फुलाची वेल कमी जागेतही छान फुलते. लहान पांढरी फुले फार सुंदर असतात. जुईची वेल नर्सरीमध्ये आरामात मिळेल.
लिलीचे छान लाल फुल बाल्कनीमध्ये लावता येते. कुंडीमध्ये ते व्यवस्थित वाढते. काळजीही फार घ्यावी लागत नाही.
बटण गुलाब दिसायला फार सुंदर असतो. एकदा फुलायला लागला की भरपूर फुलेही देतो. वेळोवेळी कापणी केल्यावर छान टवटवीत राहणारे हे रोप आहे.