उन्हाळ्यात पाणी घालूनही तुळस सुकली- काड्याच उरल्या? मातीत घाला ५ खतं, तुळशीला येईल बहर- पानंही येतील भरपूर
Updated:March 18, 2026 20:00 IST2026-03-18T20:00:00+5:302026-03-18T20:00:02+5:30
Sukleli tulas punha hirvigara karnyache upay: Tulsila bharpur pane yenyasathi tips: स्वयंपाकघरातील कोणते ५ खास पदार्थ तुळशीला नवसंजीवन देऊ शकतात, पाहूया.

उन्हाळा सुरु झाला की हिरवेगार- बहरलेली तुळस सुकू लागते. अनेकदा रोपाला भरपूर पाणी घालूनही नुसत्या काड्या उरतात. अशावेळी आपण तुळशीचे रोप काढून टाकतो. पण आपली सुकलेली तुळस पुन्हा हिरवीगार होऊ शकते. (Summer gardening tips for Indian homes)
उन्हाळ्यात रोपाला फक्त पाणी देणे पुरेसे नसते. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आणि मुळांना योग्य पोषण मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते कडक उन्हामुळे मातीतील पोषक तत्वे नष्ट होतात आणि झाडाची वाढ खुंटते. जप आपल्याही तुळशीची पानं गळली असतील किंवा फांद्या सुकल्या असतील, तर स्वयंपाकघरातील काही खास पदार्थ तुळशीला नवसंजीवन देऊ शकतात. (Tulsi plant leaves turning brown in summer)
तुळशीला नवीन पालवी येण्यासाठी अर्धा कप कच्च्या दुधात पाणी मिसळून ते आठवड्यातून एकदा मुळाशी घाला. यामुळे मातीतील ओलावा टिकतो.
तुळशीच्या मंजिरी नियमितपणे काढायला हव्या. मंजिरी काढल्या नाही तर रोपाची वाढ थांबते.
तुळशीला कीड लागली असेल तर कडुनिंबाच्या पानांचे पाणी किंवा पेंड मातीत मिसळा.
कडक उन्हात दुपारी पाणी देणे टाळा. नेहमी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतरच पाणी द्या.
पंधरा दिवसातून एकदा कुंडीतील माती थोडी मोकळी करा, ज्यामुळे मुळांना हवा मिळेल.
तुळशीचे रोप गच्चीवर किंवा थेट उन्हात असेल तर त्यावर एखादी जाळी किंवा सुती कापड बांधा ज्यामुळे उन्हाच्या झळा बसणार नाहीत.
जर मुळांना बुरशी लागली असेल, तर एक चमचा हळद पावडर मातीत मिसळा. हळद नैसर्गिक अँटी-फंगल म्हणून काम करते.