गुलाबाची पानं पिवळी होतात-फुलंच येत नाही? १ खास ट्रिक, लालबुंद गुलाबांनी बहरेल रोप
Updated:October 24, 2025 19:51 IST2025-10-24T19:25:33+5:302025-10-24T19:51:29+5:30
How To Rose Plant Bloom : अनावश्यक वाढलेल्या किंवा खराब झालेल्या फांद्या कापून टाका. गुलाबाला वेळोवेळी खत द्या ज्यामुळे रोपाला पोषण मिळेल.

गुलाबाच्या रोपाच्या (Rose Plant) चांगल्या वाढीसाठी वेळोवेळी व्यवस्थित खत देणं महत्वाचं आहे. ज्यामुळे नवीन पालवी फुटते आणि नव्या कळ्या येतात. (How To Make Rose Plant Bloom)
अनावश्यक वाढलेल्या किंवा खराब झालेल्या फांद्या कापून टाका. गुलाबाला वेळोवेळी खत द्या ज्यामुळे रोपाला पोषण मिळेल.
जर तुम्ही कुंडीत रोप लावत असाल तर आकाराने मोठी कुंडी निवडा. जेणेकरून रोपाची वाढ चांगली होईल. रोपाची माती भुसभुशीत आणि सुपीक असावी.
गुलाबाच्या रोपाला पाण्याची गरज आहे की नाही ते पाहून पाणी द्या. माती नेहमी ओलसर ठेवा. त्यात पाणी साचू देऊ नका.
दुधात कॅल्शियम असते जे रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आणि फुलं येण्यासाठी महत्वाचे असते. कच्च्या दुधात पाणी मिसळून पातळ द्रावण तयार करा आणि ते मातीत किंवा पानांवर फवारा.
ताक आणि दह्यामध्ये पाणी मिसळून पातळ द्रावण तयार करा. ताकामध्ये कॅल्शियम,प्रोटीन आणि चांगले बॅक्टेरिया असतात जे रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. महिन्यातून एकदा हे द्रावण रोपाच्या मातीत घाला.
लाकडी किंवा शेणाच्या गोवऱ्यांची राख देखील खत म्हणून वापरू शकता कारण यात पोटॅशियम आणि इतर खनिजं असतात. राखेचा वापर जपून आणि कमी प्रमाणात करावा यामुळे मातीचा पीएच बदलू शकतो.