छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

Updated:September 18, 2025 19:02 IST2025-09-18T18:58:52+5:302025-09-18T19:02:00+5:30

grow coriander at Home: home gardening tips: coriander growing tips : आपल्याला छोटीशी कुंडी, जुना डबा किंवा अगदी बाटलीतही कोथिंबीर उगवता येईल. त्यासाठी या ५ सोप्या पद्धती लक्षात ठेवा.

छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

कोथिंबीर ही आपल्या जेवणाला चव, रंग आणि सुगंध देणारा खास पदार्थ. बाजारातून आणलेली कोथिंबीर काही दिवसांतच सुकते, पिवळी पडते आणि खराब होते. अशावेळी काय करावं सुचतं नाही. (grow coriander at Home)

छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

रोज कोथिंबीर विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी ताजी हिरवीगार कोथिंबीर फोडणीत टाकली तर पदार्थाचा स्वाद अधित वाढतो. पण आपण घरच्या घरी कोथिंबीर उगवू शकतो. यासाठी आपल्याला छोटीशी कुंडी, जुना डबा किंवा अगदी बाटलीतही कोथिंबीर उगवता येईल. त्यासाठी या ५ सोप्या पद्धती लक्षात ठेवा. (home gardening tipsl)

छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

कोथिंबीरीचे रोप लावण्यासाठी आपल्याला धणे, एक छोटीशी कुंडी, बागेतली माती, कंपोस्ट आणि कोकोपीटचे मिश्रण लागेल. पाणी देण्यासाठी स्प्रे किंवा छोटा मग.

छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

आता आपल्याला धणे हातावर चोळून घ्यावे लागतील. ज्यामुळे त्याचे दोन भाग होतील. हे धणे आता ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे कोथिंबीर लवकर उगवण्यास मदत होईल.

छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

कुंडीत माती, कंपोस्ट आणि कोकोपीट घालून थोडेसे पाणी घाला. त्यात भिजवलेले धणे घाला आणि त्यावर थोडी माती पसरवा. धणे जास्त खोलवर गाडू नका, अन्यथा रोप उगवण्या वेळ लागेल.

छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

रोज कुंडीत थोडे पाणी घाला. कुंडीत पाणी साचू देऊ नका. आपण स्प्रेने पाणी देऊ शकतो. कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे ४ ते ५ तास पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. ७ ते १० दिवसांत बियांना अंकुर फुटेल. हळूहळू रोप येऊ लागले की, थोडे गांडूळ खत घाला.

छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

२५ ते ३० दिवसांत कोथिंबीरीची पाने काढू शकतात. पाने काढताना मुळे कापू नका. यामुळे नवीन पाने पुन्हा वाढतील.