तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

Updated:February 12, 2025 12:23 IST2025-02-10T19:03:33+5:302025-02-12T12:23:54+5:30

How To Care For Your Tulsi Plant At Home : How to grow and care Tulsi plant : How to make Tulsi grow faster : Tips and tricks to grow tulsi plant leaves : तुळशीच्या रोपाला खूपच लहान पान येतात तर करुन पाहावेत असे सोपे घरगुती उपाय...

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

तुळशीचे रोप आपल्या सगळ्यांच्याच घरात असतेच. फक्त धार्मिकदृष्ट्याच नाही तर आपले आरोग्य आणि पर्यावरणाची योग्य ती काळजी घेण्यासाठी तुळशीचे रोप लावणे (: Tips and tricks to grow tulsi plant leaves) अधिक फायदेशीर असते. तुळशीचे रोप घरात लावल्याने घर प्रसन्न राहते सोबतच आजूबाजूची हवा शुद्ध ठेवण्याचे काम देखील हे इवलेसे रोप करते.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

तुळशीचे रोप कुंडीत लावल्याने बरेचदा त्याची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. इतकेच नाही तर कधी या रोपाची योग्य ती काळजी घेऊन देखील रोप कोमेजून जाते. तर कधी तुळशीच्या रोपाला अगदी लहान लहान पान येतात, परंतु त्यांची वाढ नीट होत नाही. अशावेळी आपण तुळशीच्या रोपाची तसेच पानांची योग्य ती वाढ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करु शकतो ते पाहूयात.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

तुळशीचे रोप कुंडीत लावताना योग्य मातीची निवड करावी. मातीमध्ये भरपूर प्रमाणांत पोषक तत्व असतील अशाच मातीची निवड करावी.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

तुळशीच्या रोपाला दर १५ दिवसांनी शेणखत घालावे. शेणखत मातीची पोषणमूल्ये अधिक वाढवण्यास मदत करतात, यामुळे माती अधिक सुपीक बनते. त्यामुळे तुळशीची वाढ भरभर आणि चांगली होते.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

वापरलेली चहा पावडर व्यवस्थित सुकवून मातीत मिसळावी. यामुळे मातीतील मिनरल्सचे प्रमाण वाढून तुळशीच्या रोपाची वाढ चांगली होते.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

केळ्याच्या सालींचे लहान लहान तुकडे करून मातीत मिसळावे. केळ्याच्या सालीत भरपूर प्रमाणांत पोषक तत्व आणि पोटॅशियम असते. यामुळे तुळशीच्या पानांची वाढ होऊन त्यांचा आकार देखील वाढतो.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

तुळशीच्या रोपाला भरपूर ऊन मिळणे खूप गरजेचे आहे. स्वच्छ, मोकळ्या सुर्यप्रकाशात ती अधिक जोमाने वाढते. त्यामुळे तुळशीला अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातला जास्तीत जास्त वेळ तिला थेट सुर्यप्रकाश मिळेल. तुळशीच्या रोपाला दिवसांतून किमान ६ ते ८ तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते तरच तिच्या पानांची वाढ चांगली होते.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

काहीवेळा तुळशीला भरपूर पाणी घातले जाते. पण तुळशीला खूप जास्त पाणी घालू नये. तुळशीच्या कुंडीतून पाणी बाहेर येणार नाही किंवा माती सुकली असेल तर तेवढ्याच प्रमाणात पाणी घालावे. कमी ऊन आणि अतिजास्त पाणी या दोन गोष्टींमुळे तुळशीची चांगली वाढ होत नाही.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

जुनी आणि सुकलेली पानं वेळीच छाटून टाका यामुळे नवीन पान आकाराने अधिक मोठी आणि चांगली येण्यास मदत मिळते.

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

नारळाचा काथ्या जाळून त्याची तयार राख मातीत मिसळल्याने तुळशीच्या पानांची वाढ चांगली आणि लवकर होते.