घराच्या भिंतींवर पाली फिरतात? दार - खिडक्यांजवळ लावा 'ही' ५ रोपं, पाली घराच्या आसपास फिरकणारही नाही...
Updated:March 22, 2025 19:26 IST2025-03-22T19:18:58+5:302025-03-22T19:26:47+5:30
Home Remedy To Get Rid Of Lizards Indoor Plants To Keep Lizards Away From Home : Best Plants to Keep Home to Avoid Lizards : 5 Best Plants to Keep at Home to Avoid Lizards : How to get rid of lizards at home : घरात जिकडे - तिकडे पालींचाच धुमाकूळ, स्प्रे - गोळ्या, औषध ठरतील फेल, फक्त घराच्या कोपऱ्यात लावा ही रोपं...

घरात पालींचा सुळसुळाट असला की आपल्याला ते पाहून (Home Remedy To Get Rid Of Lizards Indoor Plants To Keep Lizards Away From Home) नकोसे वाटते. घरातील पालींना घराबाहेर काढण्यासाठी (5 Best Plants to Keep at Home to Avoid Lizards) आपण अनेक उपाय करून पाहतो.
वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे, गोळ्या, औषध, फवारण्या ( Best Plants to Keep Home to Avoid Lizards) करूनही काहीवेळा घरातील या पालींचे प्रमाण कमी होतच नाही. अशावेळी आपण घराच्या कोपऱ्यात काही अशी रोपं लावू शकतो, की ज्यामुळे पाली पुन्हा आपल्या घराजवळ फिरकणार देखील नाहीत.
१. लेमन ग्रास :-
जर घरात पालींचे प्रमाण अधिक जास्त असेल तर घराच्या कानाकोपऱ्यांत लेमन ग्रासचं रोपटं लावावं. या लेमन ग्रासच्या पानांचा तीव्र गंध पालींना आवडत नाही. त्यामुळे पाली घराजवळ फिरकत देखील नाहीत. घराच्या खिडक्या, दरवाजे आणि कोपऱ्यांत जिथे पाली येतात तिथे लेमन ग्रासचं रोपटं लावावं.
२. पुदिना :-
घरातील पालींना पळवून लावण्यासाठी पुदिन्याचे रोपं फायदेशीर ठरु शकते. पुदिन्याच्या पानांच्या तीव्र वासामुळे, पाली घरात लपू शकत नाहीत. अशा परिस्थितीत घरात पुदिन्याचे रोप लावा किंवा त्याचा रस काढून घराच्या कोपऱ्यात फवारणी करा. तुम्ही दाराजवळ आणि कोपऱ्यात वाळलेल्या पुदिन्याची पाने देखील ठेवू शकता.
३. तुळस :-
पुदिन्याप्रमाणेच पालींना पळवून लावण्यासाठी तुळस देखील फायदेशीर ठरते. घरात ज्या ठिकाणी पाली येतात त्या जागेवर तुळशीचे रोप ठेवावे. यासोबतच, तुम्ही तुळशीच्या पानांचा रस फवारू शकता किंवा तुळशीची सुकलेली पान देखील ठेवू शकता.
४. लसूण :-
लसूण पाकळ्यांच्या उग्र वासामुळे पाली घरात येत नाहीत. लसूण पाकळ्यांचे रोपं घरच्या बाल्कनीत लावावे. तसेच लसूण पाकळ्यांचा रस पाण्यांत मिसळून त्याची फवारणी देखील करू शकता.
५. गोंड्याच्या फुलांचे रोपं :-
गोंड्याच्या फुलांच्या उग्र वासामुळे पाली घराजवळ येत नाही. यासाठी घरांतील दार, तुम्ही गोंड्याच्या फुलांचे रोप लावू शकता.