छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

Updated:September 5, 2025 17:06 IST2025-09-05T17:01:57+5:302025-09-05T17:06:28+5:30

Grow okra at home: bhendi in pots: Okra gardening tips: फ्रेश व ताजी भेंडी हवी असेल तर सोप्या पद्धतीने घरच्या घरी लावा भेंडीचे रोप.

छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

आजकाल प्रत्येकाला ताज्या, रसायनमुक्त भाज्या घरच्या घरी पिकवण्याची हौस असते. घरातल्या बाल्कनीत किंवा खिडकीजवळ आपण छोट्या कुंडीत झाडे लावू शकतो. (Grow okra at home)

छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

भेंडीची भाजी ही अगदी सोप्या पद्धतीने कुंडीत वाढवता येते. जर आपल्याला भेंडीची भाजी आवडत असेल आणि फ्रेश व ताजी भेंडी हवी असेल तर सोप्या पद्धतीने घरच्या घरी लावा भेंडीचे रोप. (bhendi in pots)

छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

भेंडीचे रोप लावल्यानंतर ४० ते ५० दिवसांत भेंडी रोपाला येते. यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतील.

छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

जर आपणही आपल्या घरात भेंडीचे झाड लावणार असाल तर सगळ्यात आधी कुंडीत माती घाला. यामध्ये १२ ते १६ इंच पुरेल इतकी माती घाला. यात ५० टक्के माती आणि २० टक्के कोकोपिट आणि ३० टक्के शेणखत घालून माती तयार करा.

छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

आता मातीत छोटे छोटे खड्डे तयार करा. त्यात एक इंच मावतील इतके खड्डे झाल्यानंतर भेंडीच्या बिया घालून तो खड्डा बंद करा.

छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

यामध्ये पुरेसे पाणी घाला. या कुंडीला ५ ते ६ तास पुरेशा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. दर १५ दिवसांनी रोपाला खत घाला. कीटक येऊ नये म्हणून कडुलिंबाचे तेल रोपावर स्प्रे करा.

छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

अवघ्या ४० ते ५० दिवसांत रोपाला भेंडी येईल. भेंडी साधारण ४ ते ५ इंच झाली की तोडून घ्या. त्यामुळे पुन्हा त्या जागी नवीन भेंडी येण्यास मदत होईल.