छोट्याशा कुंडीत 'असं' लावा कोरफडीचं रोप, ४ टिप्स- रोप पिवळं पडणार नाही, कोरफड होईल जाडजूड, गर भरपूर
Updated:October 26, 2025 16:54 IST2025-10-26T16:51:42+5:302025-10-26T16:54:34+5:30
Aloe vera plant care: How to grow aloe vera at home: Aloe vera plant in small pot: आपल्याही अंगणात, दारात किंवा बाल्कनीत कोरफडीचे रोप लावले असेल तर या टिप्स कायम लक्षात ठेवा.

आपल्यापैकी अनेकांच्या घरात कोरफडीचे रोप असतं. हौसेन लावलेल हे रोप अवघ्या काही दिवसांत कोमेजून जातं. पाहायला गेलं तर कोरफडीचा आपल्या दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. केसांपासून त्वचेच्या सौंदर्यासाठी याचा वापर होतो. पण अनेकदा प्रश्न पडतो की, कोरफडीचे रोप व्यवस्थित लावून त्याची निगा राखूनही त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. (Aloe vera plant care)
कोरफडीचे रोप कोमेजते, कधी कधी पान आतून सुकते व गरच तयार होत नाही. जर आपल्याही अंगणात, दारात किंवा बाल्कनीत कोरफडीचे रोप लावले असेल तर या टिप्स कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे आपले रोप तर वाढेलच पण कोरफडीचा भरपूर जेल देखील तयार होईल. (How to grow aloe vera at home)
कोरफडीचे रोप लावण्यापूर्वी ते आपण थेट नर्सरीमधून आणू शकतो. त्यानंतर कुंडीत १२ इंच खड्डा तयार करा. त्यात काळी माती आणि वर्मीकम्पोस्ट घाला. यानंतर त्यात माती घाला, जी पाणी लवकर जिरवण्यास मदत करेल. यात आपण कैक्टस पॉटिंगचा देखील वापर करु शकतो.
आता आपण कोरफडीच्या रोपाची कुंडी अशा ठिकाणी ठेवायला हवी. ज्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश येईल. कुंडीत कोरफडीचे रोप लावा पुरेसे पाणी घाला आणि सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
कोरफीडच्या रोपाचे मुळ खूप ओले असतील तर त्यांना उन्हात व्यवस्थित सुकू द्या. अन्यथा मुळे खराब होतील. कुंडीत आधी माती घाला मग रोप लावा मग पुन्हा माती घालून वरुन दाब द्या. यात खत देखील घालू शकता. रोपाला रोज पाणी घालून नका. दोन दिवसांनी पाणी घातल्यास रोपाची वाढ व्यवस्थित होईल.
आपण व्यवस्थित रोपाची काळजी घेतल्यास कोरफडीच्या रोपाला भरपूर गर येईल. आणि त्याची वाढ देखील योग्य प्रमाणात होईल.