गार्डनिंगची हौस, पण मोकळी जागाच नाही? ४ टिप्स- छोट्याशा बाल्कनीत लावता येतील भरपूर रोपं..
Updated:May 8, 2025 16:09 IST2025-05-08T15:59:34+5:302025-05-08T16:09:10+5:30

काही जणांना गार्डनिंगची खूप हौस असते.. वेगवेगळी रोपं लावावी, ती छान वाढवावी, असं खूप वाटतं. पण हल्ली अनेकजणांना फ्लॅट संस्कृतीमध्ये राहावं लागत असल्याने जागेला आपोआपच मर्यादा येतात.
आता फ्लॅट म्हटला की त्याला एक किंवा दोनच बाल्कनी असतात. तेवढ्याशा जागेत किती आणि कशी रोपं लावावी, असं वाटत असेल तर या काही टिप्स पाहाच.. कारण छोट्याशा जागेतही तुम्ही खूप सुंदर सजावट करून भरपूर रोपं लावू शकता आणि तुमच्या बाल्कनीचा लूक पुर्णपणे बदलून टाकू शकता..
हल्ली अशा प्रकारचे व्हर्टिकल गार्डनिंगसाठीचे स्टॅण्ड भरपूर प्रमाणात मिळतात. ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ते मागवू शकता. याच्या मदतीने कमीतकमी जागेत भरपूर कुंड्या ठेवता येतील.
स्पायडर प्लांट, मनी प्लांट, ऑफिस टाईम, चिनी गुलाब अशा रोपांसाठी तुम्ही हँगिंग कुंड्यांचा वापर करू शकता. त्यामुळेही तुमची गार्डनिंगची हौस बऱ्यापैकी भागवली जाऊ शकते.
तिसरा पर्याय म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या घ्या आणि तुमची बाल्कनी सजवा. या कुंड्यांचा आकार लहान असतो. त्यामुळे त्या कुठेही ॲडजस्ट होतात आणि शिवाय त्यामुळे तुमची बाल्कनी जास्त छान वाटते.
गार्डनिंगची हौस भागविण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे इनडोअर प्लांट्स घेऊन ते घरात ठेवणे. घरात ज्या ठिकाणी स्वच्छ सुर्यप्रकाश येतो, अशा ठिकाणी तुम्ही इनडोअर प्लांट्स आणून घर सजवू शकता. यामुळे तुमची गार्डनिंगची हौसही भागेल आणि घराला अधिक छान लूक येईल.