छोट्या- मोठ्या आजारांवर अतिशय गुणकारी ठरणारी ५ औषधी रोपं! बाल्कनीतल्या छोट्या कुंडीतही छान फुलतील..
Updated:October 25, 2025 16:23 IST2025-10-25T16:17:27+5:302025-10-25T16:23:00+5:30

अशी काही औषधी रोपं आहेत जी आपल्या टेरेस गार्डनमध्ये असायलाच हवीत. विशेष म्हणजे या रोपांसाठी खूप मोठ्या जागेची किंवा कुंड्यांचीही गरज नसते. छोट्या कुंडीतही ही रोपं छान फुलतात.
त्यापैकी पहिलं आहे पुदिना. पुदिना हा अतिशय गुणकारी असून आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून पुदिना आपल्या पोटात जायलाच हवा.
कडिपत्त्यासारखं औषधी रोपंही आपल्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये असायला हवं. कडिपत्ता जशी पदार्थाची चव खुलवतो तसाच तो केसांसाठी आणि त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर ठरतो.
तुळशीचं रोपही आपल्याकडे असावंच. ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात देणारी तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. शिवाय हिवाळ्यात होणारा सर्दी, खोकला, कफ असा त्रास कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते.
ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असणारं कडुलिंबाचं रोपही तुम्ही थोड्या मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये लावू शकता.
कोरफडीचं रोपही आपल्या बाल्कनीमध्ये असावं. या रोपाकडे खूप लक्ष देण्याचीही गरज नसते. शिवाय तिच्यामध्ये औषधी गुणधर्मही प्रचंड आहेत.