८ दिवसांत कळ्यांनी, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल गुलाबाचं रोप, ३ खतं घाला- बघा कमाल
Updated:March 23, 2025 09:35 IST2025-03-23T09:28:49+5:302025-03-23T09:35:01+5:30

गुलाबाच्या रोपाला फुलंच येत नसतील किंवा खूप कमी फुलं येत असतील तर हे काही उपाय करून पाहा..(best fertilizer for rose plant)
या उपायांमुळे गुलाबाची पानं पिवळी पडणं, रोपाची वाढ न होणं, गुलाब सुकल्यासारखा दिसणं, फुलं न येणं किंवा फुलं आली तरी त्यांचा आकार खूपच लहान असणं अशा सगळ्या समस्या कमी होतील.(how to get maximum flowers from rose?)
यासाठी नेमके काय उपाय करावे, याची माहिती Priya's Balcony Garden या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(gardening tips for getting maximum flowers)
यामध्ये सांगितलेला पहिला उपाय म्हणजे गुलाबाच्या रोपाला १५ दिवसांतून एकदा बाजारात विकत मिळणारं NPK खत पाण्यात मिसळून द्यावं.
दुसरा उपाय म्हणजे DAP या गोळ्या.. जवळपास ७ ते ८ गोळ्या कुंडीच्या कडेने टाकाव्या. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करावा.
तिसरा उपाय म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या. गुलाबाच्या रोपाला भरपूर खत देण्याची गरज असते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या कॅल्शियमच्या गोळ्याही १५ दिवसांतून एकदा गुलाबाच्या कुंडीतल्या मातीत मिसळाव्या.. हे तिन्ही उपाय २- ३ दिवसांच्या फरकाने करा. गुलाबाला खूप छान बहर येईल.