घराच्या खिडक्या-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? कुंडीत लावा ६ रोपं - कबुतर फिरकणार देखील नाही...
Updated:May 31, 2025 15:11 IST2025-05-31T14:56:20+5:302025-05-31T15:11:35+5:30
6 Plants that Keep Pigeons Out of Your Balcony : How to Get Rid of Pigeons : How to get rid of pigeons on your balcony or patio : Home Remedies to Get Rid of Pigeons Naturally : No more Pigeons 6 plants tricks to keep them off your balcony naturally : कबुतरांना पळवून लावण्यासाठी ६ रोपं बाल्कनीत लावणं फायदेशीर ठरू शकतं...

आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गॅलरीत हमखास कबुतर येऊन बसतात. ही कबुतर संपूर्ण गॅलरी, आणि बाल्कनीची नासधुस करतात. घराच्या बाल्कनीत कबुतरांच्या पंखांची पीस, त्यांची विष्ठा यांची इतकी घाण आणि दुर्गंधी पसरते की घरात राहणेच नकोसे वाटू लागते. इतकेच नाही तर ही कबुतर बाल्कनीतील रोपांची, झाडांची देखील (6 Plants that Keep Pigeons Out of Your Balcony) वाट लावतात.
कबुतरांनी केलेल्या घाणीमुळे तसेच त्यांच्या पंखामुळे श्वसनाशी निगडीत आजार निर्माण होतात. जर आपल्याही घराच्या खिडकी बाहेर किंवा बाल्कनीत येऊन कबुतरं उच्छाद मांडत असतील तर, त्यांना पळवून लावण्यासाठी आपण आपल्या बाल्कनीत कोणत्या प्रकारची रोपं लावू शकतो ते पाहूयात. कबुतरांना पळवून लावण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो, परंतु तरी देखील कबुतर त्रास देत असतील तर आजच तुमच्या बाल्कनीत ही ५ रोपं नक्की लावा.
कबुतरांना पळवून लावण्यासाठी खाली दिलेली ६ रोपं बाल्कनीत (Home Remedies to Get Rid of Pigeons Naturally) लावणं फायदेशीर ठरू शकतं. ही रोपं त्यांचा वास, स्पर्श किंवा पानांची रचना ही कबुतरांना नकोशी वाटते आणि त्यामुळे कबुतर पुन्हा बाल्कनीत फिरकत देखील नाहीत.
१. निवडुंग :-
कबुतरांना पळवून लावण्यासाठी आपण बाल्कनीत निवडुंगाचे रोप लावू शकतो. निवडुंगाच्या पानांना असणाऱ्या टोकदार काट्यांमुळे कबुतर या रोपांच्या आसपासच्या भागात फिरकत देखील नाहीत. निवडुंगाच्या रोपांमुळे कबुतरांना तिथे थव्याने बसणं किंवा अंडी घालणं अशक्य होतं.
२. लसूण :-
बाल्कनीत लसणाचे रोप लावल्याने देखील कबुतर बाल्कनीत येण्याचे प्रमाण कमी होते. लसणाच्या रोपाला येणाऱ्या तीव्र गंधामुळे कबुतर बाल्कनीत फिरकत देखील नाहीत.
३. पुदिना :-
लसणाच्या रोपाप्रमाणेच पुदिन्याच्या रोपांच्या पानांचा येणारा तीव्र गंध कबुतरांना फारसा आवडत नाही. यामुळे कबुतर बाल्कनीत किंवा खिडक्यांजवळ येत नाही.
४. गोंड्याच्या फुलांचे रोपं :-
गोंड्यांचे फुल दिसायला सुंदर असले तरी त्याचा वास कबुतरांसहित अनेक पक्ष्यांना फारसा आवडत नाही. याशिवाय इतर कीटकांपासूनही संरक्षण केले जाते.
५. लेमनग्रास :-
लेमनग्रासचा ताजेपणा आणि तीव्र गंध कबुतरांना त्रासदायक आणि नकोसा वाटतो. यामुळे आपण बाल्कनीत लेमनग्रासचे रोप लावू शकता. लेमनग्रासचे हे रोप अगदी सहज उगवतं आणि मच्छरांपासूनही संरक्षण देतं.
६. रोझमेरी :-
रोझमेरी ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे. हिचा तीव्र वास कबुतरांना आवडत नाही. यामुळे कबुतरांना पळवून लावण्यासाठी बाल्कनीत लावणे उत्तम पर्याय ठरतो.